हे देखील माहित असू द्या

१२ आमदार, विद्वतसभा, विधान परिषद

विधानपरिषद आणि राज्यसभा या विद्वतसभा म्हणून मानल्या गेलेल्या आहेत.
सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या विषयातील विद्वान, वेगळ्या प्रकारचे काम करणारी मंडळी, इत्यादींना लोकांमधून निवडून येणे कठीणही असते आणि आवडतही नाही.
पण त्यांच्या विविध विषयातील बौद्धिक संपदेचा लाभ देशाला राज्याला मिळावा म्हणून अशा मंडळींची विद्वत सभेवर राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्ती होत असते.
परंतु याचे मर्म माहित नसलेल्या राजकारणी लोकांनी हरलेल्या राजकारण्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील १२ आमदारांची स्थाने रिक्त असताना अशाच प्रकारचे राजकीय नेते या मार्गाने आमदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे समजते.
त्यातील चर्चेत असलेले नाव म्हणजे एकनाथ खडसे. आता हा राजकीय नेता कुठल्या अंगाने विद्वत सभेत येऊ शकतो? एकाचे समाजसेवक गटात नाव होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे गणेशोत्सवात वह्या वाटल्या.
इंग्लंडच्या विद्वत सभेत न्यूटन सारख्या मंडळींची नावे होती. आणि येथे गणपती उत्सवात वह्या वाटणारे? जरा तरी जनाची नाहीतरी..
पण एका मुरब्बी व्यक्तीने हे माननीय राज्यपाल महोदयांच्या लक्षात आणून दिले आणि ती १२ जणांची यादी गेली कुठेतरी.
आता नव्या सरकारने तरी संयम बाळगीत खर्या अर्थाने समाजसुधारक,सेवक, विद्वान, जेष्ठ तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पर्यावरणतज्ञ अशांची निवड यासाठी करावी. नाहीतर तीही यादी त्याच ठिकाणी जाईल हो.

धनंजय केशव केळकर

समाजमाध्यमावरुन साभार…..

Leave a Reply