फडणवीसांच्या स्वागताच्या होर्डिंग्सवरूनही अमित शाह गायब, नाराजी कायम?

नागपूर : ०५ जुलै – राज्यातील अभुतपूर्व राजकीय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे राज्यात आता शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे भाजपमध्ये अजूनही नाराजी कायम आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून पुन्हा एकदा भाजपचे वरिष्ठ नेेेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये काय मिळवले असा प्रश्न जर कोणाला पडत असेल तर त्याचे उत्तर नागपुरमधील काही होडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. “करिष्य वचन तव…पक्ष आदेश सर्वपरि..” पक्षाच्या आदेशाचे पालन करत कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श ठेवला त्याच भावना या होर्डिंगमध्ये कार्यकर्त्यानाकडून दिल्या आहे. आम्ही पण भविष्य देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ठेवलेल्या आदर्शाचे पालन करून असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
मात्र, या होर्डिंगमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो वगळण्यात आला आहे. नागपूर हे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड आहे. होमग्राऊंडमध्येच अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून वगळण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
याआधीही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा केल्यामुळे देवेंद्र फडणवीस समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप पाहण्यास मिळाला. मुंबईमध्ये माजी महापौर संदीप जोशी यांनी बॅनर आणि होर्डिंग लावले होते, या होर्डिंगवरून अमित शहा यांचा फोटो वगळण्यात आला होता. फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चितच होते, पण अचानक पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनीच हे मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा केली. त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. पण शपथविधी सोहळ्यात दिल्लीवरून जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री स्विकारणार अशी घोषणा केली. त्यामुळे फडणवीस समर्थकांच्या गोटात संतापाची आणखी भर पडली. आता नागपूरमध्ये सुद्धा अमित शहा यांचे फोटो होर्डिगवर वगळण्यात आले आहे.

Leave a Reply