बस दरीत कोसळल्याने १६ जणांचा मृत्यू

कुल्लूः ४ जुलै – हिमाचल प्रदेशयेथील कुल्लू येथे भीषण घटना घडली आहे. सोमवारी सैज दरीत बस कोसळल्याचे वृत्त आहे. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. यातील १६ जणांचा मृत्य झाला आहे. मृतांमध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
सैंज घाटीतून शैंशर शहराकडे ही बस येत होती. याच दरम्यान जंगला नावाच्या एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सटले आणि बस थेट दरीत कोसळली. ही खासगी बस होती. या बसमध्ये काही स्थानिक प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थी होते ते सैंज येथे शाळेत जात होते. कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या अपघाताविषयी कळताच पोलिसांचे दोन पथकं तातडीने रवाना केले आहेत.
अपघात झालेले ठिकाण हे दुर्गम क्षेत्र असल्याचं बोललं जातं. बस खोल दरीत कोसळल्याने बस पूर्ण चक्काचूर झाली आहे. पोलिस व जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बस अपघाताचाी तीव्रता मोठी असल्याने बस नुकसान झाले असून बसच्या खाली किती जण दबले गेले आहेत, याची अद्याप सविस्तर माहिती समोर आली नाहीये. स्थानिक प्रशासनाने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघाताच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केलं आहे. या दुखःदप्रसंगी मी तुमच्यासोबत आहे. जे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते लवकरच पूर्ण बरे होतीस, अशी मी आशा व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन जखमी झालेल्या प्रवाशांची मदत करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच, या अपघातात जीव गमावणाऱ्या प्रवाशांसाठी पंतप्रधानांनी २ लाखांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply