सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

लोकशाही ची विटंबना

आज काल जगात लोकशाही चे किती ही पोवाडे गायले तरी पण कधी कधी वाटते की आखाती देशातील “राजेशाही” हीच् खरी लोकशाही आहे. देशाचा मान संस्कृती जर जतन करायची आहे तर एका झटक्यात निर्णय म्हणजे राजेशाही हवी. मुस्लिम राष्ट्रे सगळी राजेशाही सत्तेची. आपल्या बापाला देखील देशात उतरू न देणारी. बाप देशातून इंग्लंडला गेला त्यावेळी कतार देशातल्या राजाच्या मुलाने बगावत केली. स्वयंघोषित राजा झाला. बापाला सांगितले जा परत इंग्लंडमध्ये. आणि कतार देशाचा राजा झाला. नंतर ह्याने आपल्या बापाला परत बोलाविले आणि आई वडील दोघांनाही नजर कैदेत ठेवले. पण राजा करेल तो कायदा. तिथे मुस्लीम धर्मासाठी तर किती तरी सवलती दिल्या जातात. स्वतः ची मुस्लिम संस्कृती जपण्याची पराकाष्ठा केली जाते. भ्रष्टाचार तसूभर नाही. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लागलेले. राज्य नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या ज्या लागतील त्या त्या जनहितावह योजना कार्यान्वित केलेल्या.
लोकशाही मुल्ये तेव्हाच् देशाचे भले करू शकतील जेव्हा नेत्यांमधील भ्रष्टाचाराचा किडा वळवळ करणे थांबेल, घराणेशाही ला वाव राहणार नाही. प्रत्येक पक्षाच्या कॅलिबर प्रमाणे त्याचे मुल्यांकन केले जाईल. बाकी देशात ही बाब पाळली जात असेल कारण कुठल्याशा देशाचा राष्ट्रपती सायकलने ऑफिसला जातो तर दोन टर्म पूर्ण केलेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा पायउतार होण्याअगोदर जेव्हा भाड्याचे घर शोधायला लागतो त्यावेळी वाटते की लोकशाही मुल्ये अजुनही जिवंत आहे. लोकशाहीचा पाया मजबूत आहे. मात्र भारतात सांगा? दाखवा एखादी व्यक्ती? ज्याने आपल्या दोन टर्म मोठ्या राजकीय पदावर पुर्ण केल्या आणि भाड्याच्या घरात राहात आहेत?
भारतामध्ये तर राजकारण आणि घराणेशाही हा मोठा धंदा आहे. हो! धंदा आहे. त्यात हजारो पिढ्यांचा पैसा लाटायची क्षमता आहे. त्यातल्या त्यात जर शिवसेना सारखा पक्ष असेल, कॉंग्रेस, राकॉं, सपा, बसपा, असे सारे घराणेशाही चालविणारे पक्ष असतील तर हजारो करोड चा पैसा कसा घरात येतो? लोकांनी तुम्हाला काय स्व मालकी हक्काचा पैसा गिळंकृत करायला निवडून दिले आहे का?
पुर्वी व्हायरल झालेले टू जी घोटाळ्यात सामिल तत्कालीन मंत्री श्री राजा ह्यांचे घराचा फोटो बघितला. तुमच्या आमच्या सामान्य जनांच्या स्वप्नातले घर. मोठा बंगला अंगण म्हणजे एकरा गणिक हिरवळ आणि बगिचा. हेवा वाटला. कारण हे घर, बंगला, हिरवळ ही सामान्य नागरिकांच्या पैशातून घेतलेली. आणि एकदा मतं घेतली की सामान्य नागरिकांची गरज संपली ह्या भावनेतून सुरू झालेला भ्रष्टाचार. अरे! निवडून आलेला नेता, सेवाभावाने केव्हा कामे करणार? की बस सर्व लोकांच्या योजनांचे पैसे भ्रष्टाचारात स्वाहा करणार?
भारताला पुर्वी “सोने की चिडिया” म्हणत असत. कॉंग्रेस सत्तेवर आली आणि भारताचे भ्रष्टाचारी दोहन सुरू झाले. ते इतके केले गेले की पी. चिदंबरम म्हणायला लागले की “भारत गरीब देश है!” म्हणजे सोने की चिडिया पासून तर “सोनिया की चिडिया” पर्यंत चा हा प्रवास. नंतर कळले की लोकशाही मार्गाने निवडून आलेले हे चिदंबरम साहेब लाखो करोड गबन केले म्हणून गजाआड होते आणि केसेस चालू आहेत. त्यांनी हव्यासापोटी आपल्या मुलाला देखील राजकाररणात आणून भ्रष्टाचारात लिप्त केले आहे आणि चिदंबरम लुंगीधाऱ्याचा मुलगा सुद्धा व्हाया गजाआड कोर्ट कचेऱ्या करतोय. भारताला “सोनिया की चिडिया” एवढ्यासाठी म्हणतात कारण कुठलाही कामधंदा न करणारे हे कुटुंब. लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या अंबानी अडानी कुटुंबावर आगपाखड करीत असते. तरी जेव्हा जगातील चौथी श्रीमंत महिला नावाखाली सोनिया गांधी चे नाव येते आणि तत्कालीन सरकार कारवाई करीत नाही तेव्हा लोकशाही मुल्यांची अधोगती झाली, असे हमखास वाटते. जनतेच्या मतांना वेठीस धरून आपापली पोटली भरण्याची कसरत करून, जनतेच्या हिश्श्यातील वाटा आपल्या खिशात घालून आपण कुठली लोकशाही साजरी करतोय? पैसा आणि सत्ता ह्याचा उपयोग जर स्वतः ची स्वार्थी प्रवृत्तीला उजागर करायचा असेल तर दंडुकेशाही साजेशी राजेशाही बरी. आताशा ह्या बाई ईडी ची नोटीस आली म्हणून आजारी आहेत. काय फायदा अशा आजाराचा? राहुल गांधी ईडी च्या चकरा मारताहेत आणि परत येताना रूग्णालयात आईची भेट घेताहेत. म्हणजे आईची तब्येत बघताहेत की आई सोनियाची ईडी ची भिती वाढवीत आहेत. असला प्रकार ती दोघेच् जाणे.
आता ईडी ईडी ईडी नावाने डंका पिटणारे आपले प्रातर्विधी पत्रकार परिषदा पटू संजय राऊत. आणि त्यांना साथ देणारा पत्रकार गोतावळा!
खरं म्हणजे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब पण easy money चा स्त्रोत असणारी पत्रकारिता म्हणजे, पैसा देणाऱ्याला हवे तशा बातम्या पेरा आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल करा. म्हणजे होणारा हा भ्रष्टाचार देखील जनतेच्या पैशातून होणार! जनतेचा पैसा जनतेची दिशाभूल करण्यासाठी वापरला जाणार आणि आम्ही लोकशाही ह्या गोंडस नावाखाली गप्प बसणार! वाह रे लोकशाही!
आता संजय राऊतांच्या सर्व पत्रकार परिषदा बघा! फक्त शिवसेना, राकॉं च्या हिताची मुल्ये जपणाऱ्या. लोकशाहीची मुल्ये जपणाऱ्या कधीच नव्हत्या. तरी पण वृत्तवाहिन्यांवर ह्या बातम्या येत असत. एक प्रकारे fixing केलेल्या पत्रकार परिषदा. शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेत एक पत्रकार जास्त चिवचिवाट (प्रति प्रश्न) करीत होता. त्या पत्रकाराला बाहेर घालविण्याची सुचना केल्याचे बघितले आहे. म्हणजे आमचा पैसा आमच्या विरोधात कसा वापरला जातो, त्याचे हे द्योतक आणि आम्ही सामान्य नागरिक लोकशाहीचा उदो उदो करायचा? वाह रे खुदा तेरी खुदाई – लोकशाही और हिंदू ओकी वाट लगाई!
बरे! ज्या राऊतांना ईडी ची काडी लावली अन् भ्रष्टाचाराची विडी त्यांच्या पिछवाड्यावर शिलगावली तर लगेच पत्रकार परिषदेत धुर ओकायला लागले, आपले राऊत साहेब. धीर धरा साहेब! सांगा नं माझी मालमत्ता माझे राहते घर जप्त झाले! का तुम्ही भ्रष्टाचार केला नसता तर सुखासुखी सोडले असते? पण पत्रकार बंधु त्यांना प्रतिप्रश्न नाही विचारणार कारण के पैसा चुप कराता है! आमच्या लोकशाहीची थट्टा उडवतो आणि अशा भ्रष्ट लोकांपायी नागरिकांना हक्कापासून वंचित करतो. राऊत साहेब म्हणतात मी सच्चा शिवसैनिक आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (हे आताशा बरं! जेव्हा शिंदेंनी फाट्यावर मारली. त्या आधी सत्तेत असताना “जनाब बाळासाहेब ठाकरे”) ह्यांचा सच्चा शिवसैनिक असता, भ्रष्टाचार केला नसता तर ईडी ची हिंमत झाली नसती तुझी कॉलर पकडायची? आता वायफळ स्वतः ला धीर देतोय की मी भित नाही, सच्चा शिवसैनिक आहे. रावत्या सच्चा, कडवा शिवसैनिक असता नं तर शरद पवारांचे जोडे कधीच् नसते घासले अन् पुसले, शरद पवारांसाठी धावत धावत जाऊन बसायला खुर्ची कधी ही आणली नसती आणि शिवसेनेवर अस्तित्वाची गदा येईल असे कार्य कधीही तुझ्या हातून घडले नसते. संज्या भौ ईडी जिथे काड्या लावते तिथे घबाड सापडते ना भाऊ! हा मुद्दा पत्रकार सांगायला विसरतात तुझ्या पत्रकार परिषदेत. आणि हा घबाडाचा पैसा कोणाचा? सामान्य नागरिकांचा. म्हणजे ह्या सर्व राजकारण्यांची जागा जेलात जायची तर संजय भौ नावे ईडीला ठेवतोय आणि पत्रकार हो ला हो लावून वृत्तवाहिन्यांवर लांगूलचालन करीत छिनालगिरी करताहेत आणि लोकशाही ला नंगे करून डांबर फासताहेत. आणि ईडी कार्यालयात दाखल होताना राऊत साहेब “हात वर करून नवाब मलिकांसारखे पोस्चर देताहेत” ह्याला काय समजायचे? देशद्रोही गुन्ह्यांमध्ये सामिल अशा कलंकित नवाब मलिक चे मंत्रीपद काढायला तुमची हातभर फाटते आणि तुम्ही स्वतः ला सच्चे शिवसैनिक म्हणवता बाळासाहेबांचे. साली लानत आहे तुमच्या मर्दानगीवर! तुम्ही ऍक्शन घेता कोणावर? शिंदे चे मंत्री पद काढता. मान्य आहे त्याने हिंदुत्ववादी तत्वांसाठी बंड पुकारले. तर लगेच कारवाई. संजय साहेब काय सुंता गिंता झालाय का तुमचा? उपर घने बाल निचे कटी दुकान तर नाही? (म्हणजे मनानी मुसलमान तर झाले नाही ना, हिंदुत्व सोडून! ह्या अर्थाने लिहीले आहे. उगाच गैरसमज नको)
बरे! तुम्ही माथा टेकवलाय तर कुठे? तर काल ज्या शरद पवारांनी शपथविधी झाला त्यानंतर पत्रकार परिषद बोलावली त्यांच्या चरणी. आता बाळासाहेब त्यांना काय म्हणायचे! त्यांच्याविषयी बाळासाहेबांचे काय मत होते! ते इथे लिहीणार नाही. आणि पत्रकार परिषदे बद्दल काही बोलणार नाही. त्यांचे एकच् वाक्य महत्वपूर्ण आहे. जो पर्यंत सत्ता होती तोपर्यंत लोकशाही तत्वांच्या विपरीत सत्तेचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी घडल्या. पण सत्ता जाताच् त्यांनी एक शेवटले वाक्य बोलले आणि व्यथा उघड पडली. पत्रकार परिषदे शेवटी ते म्हणाले “मला आयकर विभागाची नोटीस मिळाली” !
नोटीस कशासाठी! तर नोटबंदी मध्ये ११०० कोटी काळ्या पैशाचे असे म्हणतात पवारांनी पांढरे करायला जमा केले. आणि आता ११०० कोटी रुपयांचा स्त्रोत सरकार विचारते आहे. अ क रा शे कोटी – हा सामान्य जनांचा हडपलेला पैसा आहे. ज्याचा स्त्रोत सरकार विचारते आहे! आणि संयुक्तिक स्त्रोत सांगण्यात असफल झाले म्हणून ही नोटीस! काय आयकर विभाग विना सबळ पुरावा नोटीस ती पण शरद पवारांना पाठविण्याची हिंमत करेल? काय ह्याच्यासाठी आम्ही नेत्यांना निवडून देतो? अशा भ्रष्टाचारी नेत्यांसाठी नेता एकच् “न खाऊंगा न खाने दुंगा” कर्तव्यनिष्ठ, कर्मठ पंतप्रधान मोदी. पंतप्रधान कसा असावा त्याचे जगातील एकमेव उदाहरण मोदी. वीस वर्षे सत्तेतील पण भ्रष्टाचाराचा एक कलंक नसणारे मोदी बघा! संसदेत पंतप्रधान म्हणून विराजमान होण्याआधी त्यांनी संसदेला मंदिर म्हणून नमस्कार केला आहे आणि संसदेला मंदिर या नात्याने त्यांचे वर्तन एकनिष्ठ आहे तर राज्यपालाच्या दिलेल्या शपथेचे उल्लंघन करीत अनिल देशमुख आज ही आमदार आहेत तर नवाब मलिक जेलमध्ये मंत्री आहेत.
लोकशाही ची ही थट्टा आहे! लोकशाही ची ही विटंबना आहे!

ह्या लेखात नवीन काहीही लिहीले नाही. फक्त भावना व्यक्त केल्या आहेत.

भाई देवघरे

Leave a Reply