अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची एनआयएन चौकशी करावी – नवनीत राणा

अमरावती : ३ जुलै – अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणाला लुट मारीतून घटना घडल्याचे सांगून गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
तब्बल बारा दिवसानंतर अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएकडे दिल्यावर अमरावती पोलिसांनी पहिल्यांदाच या हत्या प्रकरणाचा संबंध नुपूर शर्मा यांच्याबाबत केलेल्या पोस्ट प्रकरणाशी असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील एनआयएन चौकशी करावी अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
उदयपूर येथील घटनेप्रमाणेच अमरावती शहरात नुपूर शर्मा यांच्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचे अमरावती पोलिसांनी बऱ्याच उशिरा का होईना मात्र स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास ए एन आई च्या वतीने करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शर्मा यांनी दिले असून त्यांचे आभार व्यक्त करते असे देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Leave a Reply