पुसद शहरात महाविद्यालयाच्या प्रांगणात एकावर गोळीबार

यवतमाळ : ३० जून – पुसद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. गोळीबार, हत्या असे एकामागे एक गंभीर गुन्हे घडत असल्याने पुसद शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुसद शहरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालय च्या प्रांगणात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना दिनांक २९ जुन रोजी दुपारच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की पुसद शहरातील नामवंत विद्यालय गुणवंतराव देशमुख महाविद्यालय च्या प्रांगणात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून चाकु हल्ला केला या मध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे सचिन हराळ (वय ३२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. चार हल्लेखोरांनी या युवकावर गोळीबार करून व चाकु हल्ला करून गंभीर जखमी केले व पसार झाले. सचिन हराळ हा गुणवंत राव देशमुख महाविद्यालयात पत्नीला सोडण्यासाठी आला होता परत जात असताना त्याच्या वर चार हल्लेखोरांनी चाकु हल्ला करून गोळीबार केला या मध्ये सचिन हराळ गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे अधिक तपास पोलीस करीत आहे.
पुसद शहरात किरकोळ मारामारीच्या व हल्ल्याच्या घटना नेहमीच्याच आहे मात्र आजच्या सिनेस्टाईल गोळीबाराच्या घटनेत शहरात चांगलीच खळबळ उडली आहे. महाविद्यालयाच्या आवारातच गोळीबार झाल्याने पालकवर्ग व शिक्षक कर्मचारी वर्ग हादरु गेला आहे.

Leave a Reply