उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्टला

नवी दिल्ली : ३० जून – उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी काढली जाणार असून १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २० जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

Leave a Reply