मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

पिकलं पान

मी त्यांना कधीही बघितले नाही त्यांनी मला कधीही बघितले नाही. ओळख फक्त फोनवरची माझा पेपर मधला लेख वाचून त्यांनी मला फोन केला आणि बोलताना असं वाटतं की आमची ओळख ही खूप आधीपासूनची आहे बघा कसा असतं समोरच्याचं बोलणं लाघवी आपलेपणाच असल की आपणही त्यात मुरून जातो खूप दिवसापासून वाटत होता त्यांना भेटावं. मी त्यांच्याकडे गेले त्यांना अत्यानंद झाला. दिवसभर आमच्या साहित्यकावर बोलणं झाला बोलता बोलता त्यांनी एक विषय माझ्याजवळ मांडला पटकन डोक्यात कल्पना सुचली आणि त्या विषयावर लिहायला सुरुवात केली
खरंच हा विषय खूप गांभीर्यच आहे. वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि अजून जे निराधारांसाठी संस्था आहेत त्या कशासाठी असतात की ज्यांना कोणाचा आधार नसतो अशा लोकांना सहारा देण्यासाठी या संस्था आहे आज समाजात तुम्हाला चित्र दिसेल आई-वडील या मुलांना लहानाचा मोठा करतात शिकवतात आपल्या पायावर उभं करतात त्यांचं लग्न करून देतात त्याच मुलांना लग्न झाल्यावर आपले आई-वडील नको असतात. ते घरात अडगळीचे सामान त्यांना वाटायला लागतं. लग्न झाल्यावर त्यांना आपल्या संसारात आई-वडिलांची ढवळाढवळ नको असते अस चित्र आपल्याला समाजात दिसत. लग्न झाल्यावर आई वडील मोकळे होतात असं नाही त्यांची जबाबदारी अजून वाढते. त्यांना मुलं झाली की कोण सांभाळणार शेवटी आई-वडीलच कामी येतात त्यांना मोकळेपणा कधी मिळेल. आज समाजात प्रत्येक मुलाने समजून घ्यायला हवा की आज आपण आपल्या मातापित्याशी असा व्यवहार करतो आपले मुलं आपल्याशी असा व्यवहार करतील तर? प्रत्येकाने हा विचार करायला हवा. घराला घरपण केव्हा येतं ते घरात असलेल्या माणसानी . घरात जर माणसं नसतील तर ते फक्त चार भितींचाच असेल. घरात जर मुलांचा कल्लोळ असेल तर घर आनंदी राहील.

आईवडिलांची जबाबदारी ही शेवटपर्यंत संपत नाही. जी मुलं म्हातारपणी आई वडिलांना त्रास देतात तर त्या वेदनांना कोणाचाही सात्वानांचा भार सहन होत नाही वा त्या पेलवत सुद्धा नाही. खरच ह्या वयात दुःखी व वेदनादायक आणि कठीण काळात त्यांना जिव्हाळ्याची, प्रेमाची व आनंदाची गरज असते ह्या म्हातारवयात झालेल्या वेदना ह्या हृदयातच लपावल्या जातात. समजा ह्या म्हातारवयात दोघांपैकी एकजण त्याला सोडून गेला तर तेव्हा त्या व्यक्तीचे जगणे कठीण होऊन जाते अशा वेळेस मला काही पंक्ती आठवतात जे एकमेकांना साथ देतात त्यावरून
“विसरण तुला शक्य नाही, आणि मला ते अठाऊन पुन्हा तुझ्यात रमायच आणि कारण तुझ्यासोबत घालवलेले क्षण स्मरून तुझ्याजवळ येण्यात वाट पाहण्यात मला उरलेलं आयुष्य घालवायचा आहे पण तुझ्याशिवाय जगणं हे शक्य नाही आता”
आयुष्य हे जीवनातील प्रत्येक क्षणी काही ना काही शिकवत असत. ती कितीही चांगला जगल तरी कधीकधी निराशा पदरी येते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी जगता जगता ते कधी आपल्यापासून दूर जात हे आपल्यालाच कळत नाही. ज्या लेकरासाठी आईवडील संपूर्ण आपल्या आयुष्य त्यांच्यासाठी घालवतात हीच मुलं मोठी झाल्यावर त्यांना अधांतरी सोडून जातात. त्या थकलेल्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर दुःखाच्या सुरकुत्या दिसतात आणि आयुष्याचा रस्ता ओलांडताना शेवटच्या वळणावराच त्यांचीच मुलं त्यांना दुःखाचा दिवस दाखवतात. ह्या गोष्टींनी मन हे निःशब्द होऊन जातं.
आयुष्य जगतांना आई-वडिलांनी मुलाची स्वप्न आशा आकांशा पूर्ण करता करता त्यांची स्वतःची आयुष्याची पानं भरभर उडत गेली हे त्यांचे त्यांनाच कळत नाही आज त्या भिजलेल्या डोळ्यात त्यांनी कधी सुखाची आस व बघितली नाही आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलांना घडवलं होता मग आपल्या मात्र यात चार सुखाचे क्षण अनुभवण्याची अपेक्षा करू नये म्हातारपण हे झाडावरच्या सुटलेला पानासारखी असतात ते कधी गळून पडेल हे सांगता येत नाही अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये. हे म्हातारपण फक्त भिजलेल्या आसवांचे का असते? हृदयात दुःखाचे अश्रू का वाहत राहतात. त्या अश्रुंच्या जागी आनंदाश्रु वाहण्याचे स्वप्न का पाहू नये? मुलं आपल्या कुटुंबात सर्वात सुरक्षित आणि मायेच्या पंखाखाली आपल जीवन घालवतात.त्या पंखाखाली मायेचा थंड ओलावा त्यांना सुखी करत असतो. त्या मायेच्या पंखाखाली आपल्या पिल्लांना दुःखाचे चटके बसणार नाही याची काळजी ते आईवडील घेत असतात. स्वतः दुःखाचे चटके सोसून सुखाचा ओलावा द्यायचा ते प्रयत्न करीत असतात.मुलांना सर्वात जास्त प्रेम, जिव्हाळा, माया फक्त आपल्या आईवडिलांकडून मिळते. त्याच्या मायेची तुलना कोणाशीच करता येत नाही. आपल्या मुलांवर जर संकट आले तर ते हवालदिल होतात मग ज्या माता-पित्यांना काही कारणावरून वृद्धाश्रमात त्या चार भिंतीत आणून सोडलं जातं अशा मुलांना खरं त्यांचे आई-बाबा कळले असतील का? असा प्रश्न समाजात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडायला हवा आज जर कोणी वृद्धाश्रमात जाऊन बघितले तर तिथले प्रत्येक वृद्धाची नजर ही तुम्हाला दरवाज्यावर खिळलेली दिसेल कारण त्या डोळ्यात आपल्या घरून कोणी घ्यायला तर आले नाही ना? हीच आशा प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्हाला दिसेल.

आपल्या मुलांविषयी बोलताना त्याच्या मनातलं निःस्वार्थ प्रेम आपल्या अपत्याच्या दोषांवर पांघरुण घालून त्याच्याविषयी प्रेम आणि या अशा आईवडिलांनी जन्मास घातलेल्या दगडांना पाझर का नाही फुटत हा प्रश्न मला पडतो.

खरंच हे सगळं बघून मन सुन्न होतं. आई-वडिलांना त्यांना थकलेल्या हातांना आधार देण्याची गरज असते. त्याच्या म्हातारपणाची काठी बनून त्यांना सावरण्याची गरज असते. त्यांच्या अंधुक दिसणाऱ्या नजरेला स्वतःच्या नजरेने प्रकाश दाखवण्याची त्यांना खरी गरज असते. म्हणून आयुष्यात आपल्या आई-वडिलांना निर्मळ अंतकरणानी त्यांना प्रेम द्या, त्यांना जपा. फक्त तुमच्यावर ही वेळ येईल असं काही होऊ देऊ नका.

पल्लवी उधोजी

Leave a Reply