वाढत्या महागाईवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : २६ जून – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. राहुल गांधींनी ट्विट करून लिहिलंय की, पंतप्रधानांनी लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवण्याचं शास्त्र पारंगत केलंय. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 78 वर पोहोचलाय, त्यामुळं एलआयसीचं मूल्य $17 अब्जानं गमावलंय. देशात महागाई, बेरोजगारीमुळं जनता त्रस्त झालीय. DHFL ही आतापर्यंतची सर्वात मोठी फसवणूक आहे. एकीकडं भारतीय जनता संघर्ष करत असताना पंतप्रधान लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी पुढील योजना आखत आहेत, असा घणाघातही त्यांनी केलाय.
यापूर्वी राहुल गांधींनी अग्निवीर भरती योजनेबाबत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. राहुल गांधींनी ट्विट करून लिहिलं होतं की, ‘देशाच्या परमवीरांचा अभिमान आणि हुकूमशाही एका बाजूला, तर पंतप्रधान दुसऱ्या बाजूला, अशी टीका त्यांनी केली होती. राहुल गांधींनी एक मीडिया रिपोर्ट शेअर केला होता, ज्यामध्ये अग्निपथ योजना लष्कराचा नाश करेल, असं लिहिलं. या योजनेचा फायदा पाकिस्तान आणि चीनला होईल, ही योजना सर्वांवर लादण्यात आलीय, ती हुकूमशाहीला साजेशी आहे, असं म्हटलं होतं.
राहुल गांधी अग्निपथ योजनेवरून केंद्रावर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. याआधी एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी सैन्यातील भरतीची आकडेवारी शेअर केली होती. राहुल गांधींनी ट्विट करून लिहिलं होतं की, गेल्या 2 वर्षांत सैन्यात एकही भरती झालेली नाही. 2018-19 मध्ये 53431 भरती, 2019-20 मध्ये 80572, 2020-21 मध्ये शून्य, 2021-22 मध्येही शून्य भरती झाली आहे. अग्निवीराला चार वर्षांच्या करारावर आणून भाजपनं लाखो तरुणांचं देशसेवेचं स्वप्न भंग केलंय, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply