राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली : २४ जून – राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे नेते उपस्थित होते.
द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या भारताच्या सर्वोच्चपदाची निवडणूक लढवत आहेत.
द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानत ट्विट केले आहे. मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मिधुन रेड्डी उपस्थित होते.

Leave a Reply