महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही – हिमंत बिस्वा सरमा

मुंबई : २४ जून – शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीला आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पारड हळूहळू जड होत चालले आहे. शिंदे यांनी दोन्ही काँग्रेससोबत आता सत्तेत रहायचे नाही अशी भुमीका घेत एकनाथ शिंदे यांनी थेट बंडखोरी करत गुवाहाटी गाठले. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे एक एक करत जवळपास 40 आमदार शिंदे यांच्या गोटात घेतले. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आसाममधील गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक विधान केले आहे त्याबाबत सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी थेट सांगून टाकले. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
दरम्यान आसामचे कित्येक पोलीस त्या हॉटेलबाहेर सुरतक्षेसाठी तैणात करण्यात आले आहेत. ते पोलीस कोणाच्या सांगण्यावरू तिथे थांबले आहेत. तसेच जे शिवसैनिक गुवाहाटीला जात आहेत त्या शिवसैनिकांना पोलीस धरत असल्याचे समोर येत आहे. ह्या कारवाया कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत याबाबतही चर्चा केली जात आहे. हिंमत बिस्वा यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य असेल तर बंडखोर आमदार फिरायला गेले आहेत का हा सवाल उपस्थित केला जात आहे.
मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. हे मागच्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत.

Leave a Reply