६ वर्षीय मुलीसोबत ५३ वर्षीय नराधमाचे दुष्कृत्य

नागपूर : २२ जून – शहरात अल्पवयीन मुलींवर दुष्कृत्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सातत्याने अशा घटना पुढे येत आहेत. याच शृंखलेत पाचपावली पोलिस ठाण्यातंर्गत एका केवळ सहा वर्षीय मुलीसोबत एका ५३ वर्षीय नराधमाने दुष्कृत्य केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. तालीब कमाल ऊर्फ बैहरा खालीद अंसारी (वय ५३) असे अटकेतील आरोपी नराधमाचे नाव आहे. यापूर्वी देखील या नराधमावर २0१५ मध्ये एका ७ ते ८ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे वडील आणि आरोपी हे सोबतच लेबर काम करतात. सोबत काम करीत असल्यामुळे त्यांची आपसात ओळख असून एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. आरोपीचे लग्न झाले नसून तो घरी एकटाच राहतो. दरम्यान, १८ जून रोजी आरोपी हा पीडित मुलीच्या घरी आला. यावेळी घरात पीडितेसह तिची आई आणि तीन वर्षीय लहान भाऊ घरी होता. आरोपीने घरी आल्यानंतर वडिलांबाबत विचारपूस केली तेव्हा पीडितेच्या आईने ते घरी नसल्याचे सांगितले. शिवाय पीडित मुलगी आणि तिच्या भावाला आरोपीकडे देत यांचे वडील भेटल्यानंतर त्यांच्यासोबत घरी पाठवा असे सांगितले. आरोपी हा दोन्ही मुलांना घेऊन गेला. काही वेळानंतर पीडितेचा भाऊ घरी आला. आईने त्याच्या बहिणीबाबत विचारणा केली. मुलगी घरी आली नसल्यामुळे तिने मुलीची शोधाशोध सुरू केली. तिकडे आरोपीने पीडितेला उद्यानात नेले आणि त्यानंतर घरी आणून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडले. इकडे तिची आई मुलीच्या शोधात मामाकडे पोहचली असता तिला तिची मुलगी सापडली. आईने तिला कुठे गेली होती असे तिने घटनेबाबत काही सांगितले नाही. परंतु, दुसर्या दिवशी तिला उठण्या-बसण्याकरिता त्रास व्हायला लागला. तेव्हा पुन्हा आईने विचारपूस केली असता पीडितेने सर्व घटनाक्रम सांगितला. मुलीसोबत झालेला प्रकार एकूण आईच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी वडिलांना माहिती दिली. त्यानंतर रागाच्या भरात वडील हे आरोपीच्या घरी पोहोचले आणि त्याच्यासोबत भांडण करून त्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांविरुद्घही गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलीचे मेडिकल केल्यानंतर दुष्कृत्याची स्पष्टोक्ती झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१) (ए), ३७७, ५0६ भादंवि सहकलम ४, ६, पोक्सो अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Leave a Reply