राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई : २२ जून – शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 33 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तात मध्यरात्री गुवाहाटीला दाखल झाले.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा भेट होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील शिवसेने विरोधातील आणखी तीन दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढचे तीन दिवस महत्वाचे असल्याचे बोलले जात असल्याने राज्यात पुढे काय होणार हे पुढच्या तीन दिवसांत समजणार आहे. एकनाथ शिंदे आज मुंबईला राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने आता गोव्याचे राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून नियक्ती होणार आहे. राज्यपाल कोश्यारी हे एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्याने एकनाथ शिंदे यांची भेट आता गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी होणार आहे.
आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply