मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

तेथे कर माझे जुळती

ऑफिसला सुट्टी होती. वाटलं थोडसं फिरून यावं. आठवडाभर खूप काम असत ऑफिसमध्ये. रविवारी पूर्ण दिवस आराम केला. ती संध्याकाळची वेळ होती,
मी सहज बागेत फिरायला गेले. तिथे एका बेंचवर बसली. तिथे एक मुलगी मोगऱ्याच्या फुलाचा बंच घेऊन आली. मला म्हणाली, ‘ताई एखादा गजरा घ्याना’. मला त्या मुलीची खूप दया आली. मी म्हटले की,’ नको ग, काय करू घेऊन तसा तो उद्या शिळा होणार.’
ती मुलगी थोडी नाराज झाली. ती आपल्या आईला हातभार लावत होती. मी विचार केला मी जर गजरा घेतला तर हिला तेवढीच मदत होईल.
मी तिला बोलावले. ती म्हणाली, ‘ताई एक सांगू का’. मी बोलली,’ काय ग,’ ‘ ताई कोणतीही गोष्ट जी आज आहे ती उद्या नाहीशी होणार. ते फुलं असो की एखादा फुगा. कोणतीही गोष्ट ही कधीच कायम राहत नाही. आता हा गजरा आता ताजा आहे तो उद्या कोमेजनार. त्यात काय नाराज व्ह्यायच. मला कधीच वाईट नाही वाटतं. अशा गोष्टीचं वाईट वाटून घेतलं तर आम्ही काम कसं करू. नेहमी आनंदात राहायचं.’
आता तुम्हाला एक गम्मत म्हणून सांगते, हा गजरा माझ्या हातात आहे तो नंतर कोमेजून जाईल. कुठल्याही गोष्टीची कधीच तकतक नाही करायची. फुलच आहे ती कोमेजनारच. हे जर पक्क मनात ठरलं तर मग त्याचं दुःख नाही होत. किती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते माझ्याजवळ व्यक्त करत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते माझ्याजवळ बोलत होती. आपण काय व्यक्त होतो याची तिला जराही कल्पना नव्हती. परंतु जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती आज सांगून गेली. जीवन तरी अजून काय वेगळे असत क्षणिक, अनिश्चित आणि बंदिस्त आणि हे आता सगळ्यांना कळतंय तरीही आपण त्यात गुरफटलेल असतो. जीवनात सुखदुःखाच्या लाटा निर्माण होतात. माणसं आशेवर जगत हे सगळे सहन करतात. मुलगी म्हणते,फुलच ती कोमेजनाराच हे जर पक्क मनात ठरलं तर दुःख होत नाही. मी तिला शंभर रुपयाची नोट दिली आणि ते सगळे गजरे विकत घेतले.
मुंबईच्या त्या गोंगाटापासून दूर दूर शांत सागर किनारा, संध्याकाळची वेळ होती पायाला लागलेले ओलसर वाळू, किनाऱ्यावरील उसळणार्‍या लाटांचे अविरत शहनाई सारखे ते संगीत, घरट्यातल्या पिल्लू वाट बघत या ओढीने परतणारे ते पक्षांचे थवे, क्षितिजाला भेटून आकाशात रमण झाले की ती धरती मावळतीला निघालेल्या सूर्यास कदाचित त्याचे गुपित कळले असावे म्हणून लाजून आरक्त झालेले ते निरभ्र आकाश व अंधाराचे चादर लाजेखातर अंगावर ओढणारी ती धरती. कळून न कळल्याचा आव आणणारा तो भास्कर. कस रम्य वातावरण होतं की.
ह्या सगळ्या रम्य वातावरणात त्या मुलीचे मनाला ओढ लागणारे शब्द मन कसा अचंबित करत होते. त्या प्रसन्न वातावरणात कसा वेळ गेला कळलंच नाही.
घरी येताना एक आज आपण नवीन तत्त्वज्ञान शिकलो, शेवटी समजले मज कर माझे हे जुळती हेच सत्य होय.

पल्लवी उधोजी

Leave a Reply