एकनाथ शिंदेंचे बंड की शिवसेनेचा एक्झिट प्लान, सोशल मीडियावर चर्चा सुरु

मुंबई : २२ जून – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार आहेत, तसंच ही संख्या 50 पर्यंत जाईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच कन्सपिरसी थेअरीजही रंगवल्या जात आहेत. महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा हा शिवसेनेचाच एक्झिट प्लान नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवसेनेच्या एक्झिट प्लानची कन्सपिरसी थेअरी
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार मातोश्रीला थेट आव्हान कसं देऊ शकतात?

  • शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली आहेत, जो फॉर्म्युला 2019 ला भाजपला दिला आहे.
    एकीकडे चौकशीचा ससेमिरा, तसंच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा थेट राष्ट्रवादीशी होणारा सामना टाळता येऊ शकतो.
  • महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजपसोबत थेट सामना झाला आणि मुंबई महापालिकेतली सत्ता जाण्याची भीती?
    महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यात आता नवा ट्वीस्ट आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालली आहे, असं खळबळजनक ट्वीट केलं. संजय राऊत यांच्या या ट्वीटनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply