आज जे माझं स्वास्थ्य आहे ते योगामुळेच – नितीन गडकरी

नागपूर : २१ जून – माझी आई सुद्धा योग प्रचार प्रसाराचे काम करायची. बालपणी मला योग करायला सांगायची. तेव्हा महत्व कळले नाही पण जेव्हा माझी प्रकृती बिघडली तेव्हापासून योगकडे वळलो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. आज जे माझं स्वास्थ्य आहे ते योगामुळेच, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. नागपुरात ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या झिरो माईलपासून काही अंतरावर असलेल्या के.पी. मैदानावर योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्यने योग अभ्यास करायला नागपूरकर यात सहभागी झाले.
अमिताभ बच्चन यांनी मला एका कार्यक्रमात विचारले की, तुम्ही काय करता? 10 वर्षे तुमचे वय कमी वाटते. मी त्यांना सांगितले मी नियमितपणे एक तास योग करतो. आज अनेक भारतीय विदेशात योगाचे धडे देतात. सगळ्यांनी रोज योगा केला तर स्वस्थ्य चांगले राहील. 8 वा योग दिवस आपण साजरा करत आहोत. दोन वर्षे हे आपल्याला करता आले नाही. पंतप्रधानांची ही संकल्पना दूर पर्यंत पोहचली. आज अनेक देशात योग पोहचला, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. योग सगळ्यांसाठी महत्वाचा आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. याच क्रमाने आज लोक जीवनात योगाचा अवलंब करत आहेत. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज, मंगळवारी जगभरात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. या दिवशी अनेक देशांतील लोक योग दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमून योग करताना दिसतात. देशभरात योग दिन यशस्वी करण्यासाठी विविध तयारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील 75 मंत्री देशातील 75 विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणी योग करताना दिसणार आहेत.

Leave a Reply