नागपुरातील प्रतापनगरात २३ लाखांची घरफोडी

नागपूर : २० जून – शहरातील प्रतापनगर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीची घटना पुढे आली आहे. या घटनेत चोरट्याने तब्बल २३ लाख ५६ हजार ८0 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. फिर्यादी हे बाहेरगावी गेले असता चोरट्याने त्यांच्या घरावर लक्ष केले आणि रोख रकमेसह सोन्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांवर हातसाफ केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, १७ ते १८ जूनदरम्यान सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान, फिर्यादी श्रीव्यंकट सूर्यनारायणराव आत्रेयपुरपू (वय ५९, रा. प्लॉट नंबर ३१, फेन्डस ले-आउट, दीनदयालनगर) हे बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, कुणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील आलमारीच्या लॉकरमधील रोख ५ हजार रुपये तसेच सोन्याचे व हिर्यांचे दागीने, हाताचे घड्याळ असा एकूण २३ लाख ५६ हजार ८0 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी जेव्हा बाहेरगावावरूनघरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निर्दशनात आले. त्यांनी आलमारी बघितली असता त्यातील लॉकरमधील रोख रक्कम, सोन्याचे व हिर्याचे दागिने दिसून आले नाही. परिणामी, त्यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८0 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply