नागपूर विभागाचा निकाल ९७.९३ टक्के, निकालात यंदाही मुलींची बाजी

नागपूर : १७ जून – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला. राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. गेल्या वर्षी निकालाचा टक्का 99.84 इतका होता. विशेष म्हणजे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून विभागात 98.18 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
विभागातही मुलीच अव्वल
बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत कमी संख्येने बसूनही जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण झाल्या आहे. यामध्ये यावर्षी 78 हजार 987 मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी 75 हजार 739 मुले उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी 95.88 इतकी आहे. याशिवाय दहावीची परीक्षा 74 हजार 752 मुलींनी दिली. त्यापैकी 73 हजार 394 मुली उत्तीर्ण झाल्यात. त्याची टक्केवारी 98.18 इतकी आहे.
फेरपरीक्षेत 82 टक्के उत्तीर्ण
दहावीच्या निकालात यंदा फेरपरीक्षार्थीच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झालेली आहे. विभागात 82.01 टक्के फेरपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षा 3 हजार 441 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 2 हजार 415 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागनिहाल निकाल
नागपूर 97.93
भंडारा 97.26
गोंदिया 97.07
वर्धा 96.24
चंद्रपूर 95.97
गडचिरोली 95.62

Leave a Reply