राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली : १५ जून – नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी बुधवार (दि. 15 जुन) रोजी ED’कडून चौकशी होत आहे. सकाळी 11 वाजता ते चौकशीसाठी हजर झालेले आहेत. आता नुकते ते दुपारच्या जेवणासाठी ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत. ते जेवणानंतर पुन्हा चौकशीसाठी दाखल होणार आहेत. दरम्यान, राहुल यांची 13 जुनपासून सलग दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी सध्या दुपारच्या जेवणासाठी ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरण (2012)मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या (2000)कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.
राहुल गांधी यांना जेवणासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर राहुल हे सोनिया गांधी ज्या गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी आई सोनिया यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या कोरोनाच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. जेवनानंतर राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. यामध्ये राहुल यांची आणखी चौकशी झाली.

Leave a Reply