ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सरचे निदान

नागपूर : १३ जून – महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीशी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. डॉ.प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. त्यामुळे मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाला गेल्या डिसेबर महिन्यात 48 वर्ष पूर्ण झाले आहेत. या सेवेने आता 49 व्या वर्षी पदार्पण केले. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत.
आमटे दांपत्य नुकतेच नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले होते. नागपूर, पुणे, मुंबई सारख्या शहरात वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई करण्याची संधी समोर असताना डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी बाबांसोबत हेमलकसात पोहोचले. घनदाट जंगलात चारही बाजूने जंगल, वन्यप्राण्यांचे वास्तव्य, वीजपुरवठा नाही, पिण्याचे शुद्ध पाणी नाही, आदिवासींची संवाद साधण्यासाठी त्यांची मातृभाषाही अवगत नाही, अशा अवस्थेत बाबांच्या उपस्थितीत एका झोपडीमध्ये लोकबिरादरी प्रकल्प सुरु करण्यात आला. हा लोकबिरादरी प्रकल्प एका लहानश्या रोपट्याच्या माध्यमातून सुरु होऊन आज वटवृक्षामध्ये परिवर्तित झाला आहे.

Leave a Reply