दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळला

वर्धा : ११ जून – कारंजा तालुक्यातील सुसूनद्रा गावालगत जंगलातील दुर्गम भागात दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था फार वाईट असल्यामुळे बिबट नर आहे की मादी, हे ओळखणेसुद्धा कठीण होते.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केली आहे. बिबट्याचे सर्व अवयव सडलेल्या अवस्थेत व मागचा भाग रानटी कुत्र्यांनी तोडल्याचा निष्कर्ष आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच बिबट नर आहे की मादी, हे कळेल, असे जिल्हा वन अधिकारी सेपट यांनी सांगितले. मानद वन्य जीव संरक्षक कौशल मिश्रा म्हणाले, ही दुर्मिळ अशी घटना म्हणावी लागेल.
वर्धा : कारंजा तालुक्यातील सुसूनद्रा गावालगत जंगलातील दुर्गम भागात दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था फार वाईट असल्यामुळे बिबट नर आहे की मादी, हे ओळखणेसुद्धा कठीण होते.

Leave a Reply