शहरात कोरोनाने पुन्हा पसरले हातपाय, एकाच दिवशी ४३ नवे बाधित

नागपूर : १० जून – कोरोनाच्या प्रकोपानंतर सर्वसामान्य जनजीवन रुळावर येत असतानाच शहरात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरणे सुरु केले आहे, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावण्याची परिस्थिती येते कि काय? असे वाटू लागले आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ४३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवसांआधीच नागपुरात २५ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर गेल्या २४ तासात पुन्हा ४३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५७७९७६ इतकी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात ५ तुंगना कोरोनमुक्त झाले असून एकूण कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५६७५३६ वर गेली आहे. बरे होण्याचे प्रमाण ९८.२१ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोईनने एकूण १०३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये २ शहरातील २ जिल्ह्याबाहेरील तर एक ग्रामीण भागातील आहे. तर बाधितांमध्ये ११ ग्रामीण भागातील २९ शहरातील तर ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. सध्या शहरात १०२ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील ३२ ग्रामीण भागातील ६७ शहरातील तर ३ जिल्ह्याबाहेरील आहेत. सर्व बाधित रुग्णांवर घरीच उपचार सुरु असून, प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे व कोरोनाचे सर्व नियम पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply