मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने सुनावली ३ महिने कारावासाची शिक्षा

अमरावती : ७ जून – सरकारी अधिकाऱ्यावर पाण्याची बॉटल आणि शाईफेक प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदाराला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषद सदस्य असताना दिनांक 28 मे 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक व पान्याची बॉटल फेकून मारली होती.
तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज अमरावती येथील जिल्हा न्यायाधीश एस एस अडकर यांनी सुनावली. आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्याचा कारावास आणि 15 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदार संघातून भाजप नेते तथा तत्कालीन कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा पराभव करून 2019 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटवर विधानसभेवर निवडून आले आहेत. मात्र, निवणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सलगी केल्याने त्यांना पक्षाचे नेते माजी खा.राजू शेट्टी यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. एक आक्रमक आणि कार्यकर्ता नेता म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख आहे.

Leave a Reply