विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गर्मीमुळे पोल्ट्री फार्ममधील १९७० कोंबड्यांचा मृत्यू

वर्धा : ३ जून – जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील मलातपूर येथे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1970 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला. या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात वाढ झालीय, यातच कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.
मलातपूर येथे सागर पजगाडे यांचे आठ हजार कोंबड्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र आहे. स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्ह्णून बँक ऑफ इंडिया येथून 15 लाखांचा कर्ज काढत व्यवसाय सुरु केला. त्यांचा व्यवसाय जोमात असताना वीज वितरण कंपनीकडून परिसरातील वीज पुरवठा महावितरणने कामासाठी खंडित केला. तब्बल पाच तास खंडित असलेल्या वीज पुरवठामुळे पोल्ट्री फार्ममधील तापमानात वाढ झाली. पोल्ट्री फार्मचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एकसोस्ट फॅन आणि दोन मोठे कुलर लावले होते. सोबतच वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जाते. मात्र विद्युत पुरवठा बंद असल्याने हे सर्व बंद होते आणि यामुळे शेतकऱ्याच्या कोंबड्यांचा मृत्यू झालाय.
शेतकऱ्याने या प्रकरणाची देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक दृष्ट्या उष्माघाताने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Reply