देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते – संजय राऊत

मुंबई : ३ जून – महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते असल्याचं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते आहेत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रदूषित, गढूळ झालं असताना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अजून बिघडण्याची शक्यता वाटत आहे. घोडेबाजार महाराष्ट्रात अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे”.
“निवडणुका जिंकण्यासाठी जो पैसा आणला जात आहे त्याचा ईडीने तपास करायला व्हा. आमदारांना विकत घेण्यासाठी प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत? कोटींच्या आकड्याागचे सूत्रधार कोण आहेत? याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे. सर्व पक्ष शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply