गडचिरोलीत राज्य राखीव दलाच्या जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार करत केली आत्महत्या

गडचिरोली : २ जानेवारी – राज्य राखीव दलाच्या जवानाकडून दुसऱ्या जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या जवानाने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यात बॅरकमध्ये संबंधित घटना घडली. राज्य राखीव दलाच्या जवानांमध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली. श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला गोळया घालून ठार केले. नंतर स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली.
2007 बॅचचे मृतक जवान बंडू नवथर हे दोन तासांची ड्युटी पार पाडून आराम कक्षात आले. त्यानंतर श्रीकांत बेरड यांनी पाठीमागून 5 गोळ्या पोलीस हवालदार बंडू नवथर यांना घातल्या. नंतर श्रीकांत बेरड यांनी आराम कक्षाच्या बाहेर जाऊन स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यात बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला अशी मृत झालेल्या जवानांची नाव आहे. पुण्याहून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात झाले होते.
राज्य राखीव दलाच्या जवानामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर रायफलमधून गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply