मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाने मानलेला आपलेपणा…..

सख्ख कोणाला म्हणावं? रक्ताच नातं असतं ते सख्ख. सख्ख म्हणजे आपलेपणा. आता, हा आपलेपणा कसा असावा, ज्याला आपण मनातल सगळं सांगू शकतो. आपल्या विश्वास असतो तो कधीही दगा देणार नाही. मनात आलं तेव्हा आपण प्रत्यक्ष रित्या भेट देऊन आपण मनातलं त्याला आपले हितगुज सांगू शकतो. त्याला खर आपलं म्हणता येईल.
आता ह्या कलियुगात सक्खेच नातेवाईक एकमेकांच्या विरोधात जातात. ‘एकप्रकारे शेजारचा परवडेल पण सख्खा नको’ अशी म्हणण्याची वेळ येते, अथवा ह्याला आपलं काही कळता काम नये ह्याची खबरदारी घेतली जाते. त्याला सख्ख म्हणता येईल का? नाही ना?
आता आपल्या मनाने ज्याला आपलं मानलं तो आपलेपणा, काय? तर, ज्याच्या घरी गेल्यावर कपाळावर आठ्या न येता आनंदानी तो स्वागत करेल. आपल्याला पाहून त्याला अत्यानंद होईल. आपल्या अपमानाची जिथे गोष्टच येत नसते किंवा फोन करून का नाही आलीस हा प्रश्न सुद्धा विचारला जात नाही ते असतं आपलेपण.
आपण एखाद्या मंदिरात जातो त्या मंदिरातील देव म्हणतो का? बरं झालं आलीस. किंवा आपल्याला देवाचा कॉल येतो का की माझ्या दर्शनाला येतेस का? नाही ना. कारण आपल्या मनाला वाटते तेव्हा आपण दर्शनास जातो.देव म्हणतो का की मला तू हीच अमुक गोष्ट दे. किंवा देवाकडून आपण काही भेट वस्तू घेतो. नाही ना? तुमचं जेव्हा मन स्थिर नसतं. आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपण मंदिरात जातो. आपलं मन तिथे शांत होतं. तिथून निघाल्यावर बाहेर पडतो तेव्हा मागे वळून आपण पहातोच ना. ती असती तुमची देवाविषयी भक्ती, देवाबद्दलचा आपलेपणा.
आपलेपणा म्हणजे दुसऱ्यांना भेटण्याची आपल्या मनाला लागलेली ओढ. भेटल्यानंतर पुन्हा कधी भेटशील हा प्रश्न जिथे पडतो ते असते आपलेपण. नवरा बायको, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी ह्यामध्ये जे नातं असतं, मी त्याचा आहे किंवा ती माझी आहे ही भावना दोघांच्याही मनात जेव्हा येते तो असतो आपलेपणा.
दुसऱ्यांचा राग, तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही.आईच्या कुशीत भाऊ बहिण एकच नाते निर्माण होत. हे एकाच कुशितले असतात, मग मोठे झाल्यावर त्यांच्यात वाद का निर्माण होतात? ह्याला आपलेपणा म्हणावा का? बहिणी बहिणी मध्ये दुष्मनी निर्माण होते, हीच चांगल झाला मग माझाच का वाईट, ही खूप शिकली. ह्याचा राग करायचं का की कौतुक . हे नाते जरी आपले असेल तरी जेव्हा ही भावना मनात घर करते तेव्हा ते नाते आपले कसे होईल? नाही ना? एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणे, एकमेकांना समजून घेणे, मदत करणे, ह्याला आपलेपणा म्हणतात. अहो राग, तिरस्कार करून तुम्ही एकप्रकारे स्वतःच्या माथी पापच ओढून घेता ना. सोडून द्या सगळे, नका करू हा राग, हा तिरस्कार. प्रेमाने राहून बघा. बघा मग दुसऱ्यातही आपोआप बदल होतो की नाही.

पल्लवी उधोजी

Leave a Reply