बाहुलीला फाशी दिल्यानंतर ८ वर्षीय मुलाने स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या

पुणे : १ जून – बाहुलीला फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय मुलाने स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुलाने स्वतःही तोंडावर तसेच कापड टाकले अन मग गळफास घेतला. दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना थेरगावमध्ये घडली. मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ पाहून तसे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये राहत्या घरात आठ वर्षीय मुलाने खेळता-खेळता बाहुलीवर कपडा टाकून फाशी दिली. बाहुली मृत झाल्याचे समजून मुलाने देखील तोंडावर कपडा टाकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई कामात व्यस्त असताना त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस देखील चक्रावले आहेत. मुलाने मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ पाहून असे कृत्य केल्याचा अंदाज वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवण गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply