मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

पाठलाग – मनातल्या स्वप्नांचा

आपल्या डोळ्यात असलेले स्वप्न आणि त्या स्वप्नातील माणसं, आपल्याजवळ असलेल्या पैशापेक्षा जास्त श्रीमंत म्हणता येईल.
आज अस चित्र दिसत, ज्याला त्यालास्वप्नांचा पाठलाग करण्याची सवय झाली आहे. स्वप्न असो, इच्छा असो वा अपेक्षा ही यादी मुळातच न संपणारी आहे. आज प्रत्येकजण ह्या स्वप्नांच्या मागे इतका धावत सुटला की त्याला हे देखील माहीत नसतं की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस मागे सरतो आहे. त्यासोबतच स्वप्नाचा पाठलाग करता करता अठवणीपण मागे जात आहेत. अथवा ह्या आठवणी कटू असो वा गोड ह्या कधीही पुसल्या जात नाही. आपलं एक स्वप्न पूर्ण झाला की, आपण लगेच दुसऱ्या स्वप्नाकडे बघतो. ह्यालाच का आयुष्य म्हणावे?
आयुष्य हे न उलगडणारे कोडे आहे. आपली खरी परिस्थितीचे ऊन जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा आपण आपल्या स्वप्नातून जागे होतो, अथवा सावलीत उभे रहातो.
माझ्यावर जेव्हा खूप मोठे संकट आलं तेव्हा मला खऱ्या आयुष्याचं महत्व कळलं. आज आहे पण उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे कोणाला तुम्ही शब्द दिला असेल तर त्याची वाट नका पाहू लगेच तो पूर्ण करा. कारण आयुष्याचा भरवसा कोणीही देऊ शकत नाही. आपण जे विचार करतो ते कधीच होत नाही, कारण डोक्यात असंख्य विचाराचा गुंता सुरू असतो. चांगल्या गोष्टी आठवण्या ऐवजी आपण वाईट गोष्टी आठवतो. ह्यावरून मला माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट आठवली, ती खूप गरीब होती. गरीब असणे हा काही गुन्हा नाही. लग्न झाल्यावर तिच्या सासूने तिचा छळ केला. पण वेळे प्रसंगी तिला सावरलं, गर्भवती असताना तिची खूप काळजी घेतली. ती मला नेहमी तिच्या सासुबद्दल तिने मला कसा त्रास दिला हे सांगायची. मी तिला समजावलं की, अग, तू नेहमी वाईट गोष्टींचा विचार का करते? चांगल्या गोष्टी पण बघ. तिने तुला काही बोलले तर अस समज तुझी आई तुला काही चांगले सांगते, नको लक्ष देऊ. तुझी आई असती अन् तुला बोलली असती तर तू असेच गाऱ्हाणे सांगितले असते का. तू गर्भवती होती तेव्हाच्या गोष्टी आठव, सगळ सोडून तिची लेक बन. नेहमी वाईट ऐवजी चांगल्या गोष्टीचा विचार कर. माझ्या सांगण्याचा उद्देश हा की, आयुष्यात येणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टी पैकी आपण चांगल्या सोडून वाईट गोष्टींचा विचार जास्त करतो. चांगल्या गोष्टी आपण स्मरणात ठेवत नाही. स्वप्नांचं असाच आहे, स्वप्नात येणाऱ्या सुखद आठवणी सांगण्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त आठवतात व आपण त्यात गुंतत जातो.

पल्लवी उधोजी

Leave a Reply