नागपुरातील दोन सॉ मिलमध्ये लागली आग

नागपूर : ३१ मे – नागपूरातील नागेश्वरनगर परिसरात कापसी बिडगाव मार्गावर सकाळी चारच्या सुमारास दोन सॉ मिलमध्ये आग लागली. दोन्ही लाकडाच्या सॉ मिल असल्याच्या कारणाने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे सहा फायर टेंडर घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांच्या परीश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.उद्याप आग लागण्याचे कारण समोर आले नाही.
अलिकडच्या काळात शहरात आगीच्या घटना वाढल्या आहे. यातच सकाळी चारच्या सुमारास नागेश्वरनगर, कापसी बिडगाव मार्गावरील खेतानी एंटरप्राइज आणि हिराधन टिंबर येथे आग लागली. घटनेची माहिती आपातकालीन कक्षाला मिळताच कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट येथील अग्निशमन केंद्रातील सहा फायरटेंडर घटनास्थळी रवाना झाले असल्याचे मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी कळवले. या आगीत लाकडांसह लाकडून तोडण्याचे यंत्र आणि शेजारील दोन दुकानेही आगीत भस्मसात झाली.दरम्यान सॉ मिलमध्ये आग लागण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही दुकान, गोडाऊन आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Reply