माझी कुठलीही इच्छा नाही, आता पक्ष काय ठरवेल ते महत्त्वाचे – पंकजा मुंडे

नागपूर : ३० मे – राज्यासाठी कुणाच्या नावाची घोषणा झाली हे मला माहीत नाही, मी प्रवासात होती. राज्य सभेसाठी माझे नाव चर्चेत नव्हतेच. ज्यांचे नाव जाहीर झाले त्यांच्याबद्दल मला आनंद आहे. पीयूष गोयल यांचे नाव स्वाभाविकरित्या जाहीर होणार होते. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे अनिल बोंडे यांनाही संधी मिळाली. तुमची विधानपरिषदेसाठी ईच्छा आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना माझी कुठलीही इच्छा नाही, आता पक्ष काय ठरवेल ते महत्त्वाचे आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलल्या. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. यात महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राज्याचे माजी मंत्री डाॅ. अनिल बोंडे तसेच धनंजय महाडिक यांची उमेदवारी घोषित केली आहे. राज्यसभा निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी लढत असून शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न केले, पण शिवसेनेने त्यांना शिवबंधन घालण्याची अट ठेवली. शेवटी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्या नंतर भाजपने तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरू केली, असे वातावरण तयार केले होते. पण भाजपने आज जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातून दोन उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर केली आहेत.

Leave a Reply