सर्वांचा सर्वांगीण विकास हेच आम आदमी पक्षाचे लक्ष्य – डॉ. शाहिद अली जाफरी

गुड मॉर्निंग क्लबच्या सदस्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

29 may aapनागपूर : २९ मे – देशात स्वास्थ्य व शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाचे समर्थक दिवसेंदिवस वाढत आहेत, जाती-धर्माच्या राजकारणापलीकडे विकासाचे राजकारण करणाऱ्या आम आदमी पक्षाचे देशभरात स्वागत होताना दिसत आहे. दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचे जे विकासाचे राजकारण सुरु आहे त्याकडे आकर्षित होऊन, देशासाठी व समाजासाठी काही चांगले करण्याचा ध्यास असलेल्या चांद्रमणीनगर येथील उद्यानातील गुड मॉर्निंग क्लब व सीएनजी च्या सदस्यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
चांद्रमणीनगर येथील उद्यानात सकाळी दररोज व्यायाम करायला येणाऱ्या आबालवृद्धांनी एक क्लब स्थापन करून आपली ऊर्जा एकत्रित केली आहे, व त्या ऊर्जेतून सर्वांच्या उत्थानासाठी काही करण्याच्या उद्देशातून आज या क्लबच्या काही सदस्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला आहे. यावेळी कसलाही गाजावाजा न करता एका छोटेखानी कार्यक्रमात जो या उद्यानातच आयोजित करण्यात आला होता, याच कार्यक्रमात क्लबच्या सदस्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला. कार्यक्रमाला विदर्भ डॉक्टर्स विंगचे संयोजक व दक्षिण नागपूरचे प्रभारी डॉ. शाहिद अली जाफरी, निखिल मेंढवाडे, मेघा वानखेडे, संयोजक मनोज डफरे, उमाकांत बनसोडे आदींची उपस्थिती होती. युवराज चौधरी तसेच विनोद बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. शाहिद अली जाफरी यांनी पक्षाबद्दल मार्गदर्शन करताना पक्षाचे उद्दिष्ट तसेच पक्षाचे लक्ष्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच निखिल मेंढावाडे यांनी स्थानिक समस्या व त्यावर करायचा उपाययोजना यावर पक्षप्रवेशासाठी इच्छूकांना मोलाचे मार्गदर्शन केले, व मिळून सर्व समस्या सोडवण्याचे वाचनही दिले.
या समारंभात गुड मॉर्निंग क्लब तसेच सीएनजी ग्रुपच्या प्रमुख सदस्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला. सर्व सदस्यांना पक्षाची टोपी देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शेखर जिवने, प्रदीप थुलकर, शशिकांत फुलझेले, जगदीश झिलपे, बादल, अशोक कांबळे, निशिकांत मानवटकर, कुणाल कांबळे इत्यादींनी तर महिलांमध्ये दर्शना जिवने, हिरा मेश्राम, मीना शेंद्रे आदी महिलांनी यावेळी पक्षप्रवेश केला व पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचे वाचन दिले.

Leave a Reply