लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने केला विधवेवर अत्याचार

नागपूर : २९ मे – चांगली-वाईट परिस्थिती आयुष्याचा भाग आहे. परिस्थितीतून माणूस घडतो, शिकतो आणि मोठा होतो. परंतु, या संघर्षाच्या काळात जे वाईट अनुभव घडतात ते कायम लक्षात राहतात. यादरम्यान परिस्थितीचा फायदा उचलणारी मंडळीदेखील संपर्कात येते. अशीच एक घटना लकडगंज पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका विधवेवर चक्क एका पोलिस शिपायानेच अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर त्याच्या विरोधात या पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलिस शिपाई हा फरार आहे. हेमंत हिरामण कुमरे असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने २0१२ मध्ये काही कारणास्तव आत्महत्या केली. त्यानंतर या आत्महत्येचा तपास हा आरोपी हेमंत कुमरे याच्याकडे होता. चौकशीदरम्यान, त्याने तपासाचा भाग म्हणून पीडितेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. अशातच, २0१४ मध्ये पीडित महिलेच्या पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. भाऊ आणि पती गेल्यानंतर पीडिता ही एकटी पडली. नेमकच्या याच परिस्थितीचा फायदा आरोपी हेमंत कुमरे याने घेतला. तो तिला काहीना काही कारण काढत फोन करायचा. दरम्यान, २0१५ मध्ये कुमरेने पीडित महिलेला कामानिमित्त खोब्रागडे चौकात भेटण्यासाठी बोलावले. आरोपी पोलिस शिपायाने बोलविल्याप्रमाणे ती भेटण्याकरिता आली. यावेळी आरोपी हेमंत कुमरे हा त्याची मारोती आल्टो कार घेऊन आला आणि तिला सोबत घेऊन सावनेर रोडवरील एका सुनसान ठिकाणी आणले. याठिकाणी त्याने तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी हेमंतने त्याचे त्याच्या पत्नीशी पटत नसल्यामुळे मी तिला लवकरच सोडणार असल्याचे पीडितेला सांगितले. मला तुझ्याशीच लग्न करायचे असल्याचा विश्वास त्याने दिला. त्यानंतरही पीडित महिलेने त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो पीडितेला भावाच्या आत्महत्येच्या प्रकरणाची धमकी देऊ लागला. कुमरेच्या सततच्या या धमकीमुळे पीडित महिला त्याच्या वासनेला वारंवार बळी पडली. पीडितेने हेमंतला लग्नाची गळ घातली. लग्न कधी करणार, असा तगादा लावल्यानतर तो लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. पीडितेच्या अशा भूमिकेमुळे तो तिला मारहाणदेखील करीत होता. अशातच लकडगंज वाहतूक शाखेत हेमंतची बदली झाली. त्यानंतर त्याने पीडितेला भेटणे आणि तिच्यासोत बोलणे बंद केले.

Leave a Reply