वाचवा…रे मले!! – डॉ राजा धर्माधिकारी

काल राजेहो मी नदी दाखवायले लेकरं घेऊन गेलो..त थे राजेहो थे नदीच व्हती रडत…!

मले सांगे भाऊ पाह्यरे..पह्यले किती उंचाहून मस्त व्हती पडत!!

पाह्य गड्या ,मतलबी लोकाहींन कस केलं ,माहय निरेनाम खोबर..!

अरे एका जमान्यात माह्या थाग नव्हता लागत..आतातूच पाह्य ..कस होऊन गेल माहय डोबरं!!

पाहयटीच पाहयटी गावातल्या लोकाहीचा..माह्याशिच पडते पाला…!

अन साजरं प्या जोगत्या पान्याचा नीराकरून टाकला गोदरी नाला!!

कोनी धुतले ढोर कोणी धुतले कयकले कपडे…!

आता काय सांगू तुम्हाले,माह्याशेजी काय काय करतात लफडे!!

कारखान्याही च निरेनाम जहरी पानी माह्यातच हाय सोडलं..!

सडल्या हार फुलाहीच मडकं.. लोकाहींन माह्याचं उरावर फोडलं!!

तुमचे घर झाडता.. अन माह्याचं पाण्यात टाकता गरदा

अरे कोनी कोनी राजेहो कायसांगू..सडाल फेकतत मुरदा!!

अरे ,वाचवारे मले ..लय बिमार झालीरे तुमची माय…!

नाय तर पुढच्या पिढीले मले फक्त ..नकाशात दाखवाल काय?!!

डॉ राजा धर्माधिकारी
परतवाडा.

Leave a Reply