यंदा 75000 अमृत सरोवर करण्याच्या प्रयत्न करणार – वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींचा संकल्प

नागपूर : २७ मे – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची गर्दी झाली आहे. निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली आहे. या निमित्ताने नागपूर शहरातही भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी मोठा संकल्प केला आहे. 75000 अमृत सरोवर करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, माझे सगळे मित्र आणि अभिष्टचिंतक यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. देशासाठी सेवा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे, विदर्भात शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी सतत प्रयत्नरत राहील, असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले की, भारताला स्वातंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल उद्या अमृत सरोवर कार्यक्रमा अंतर्गत पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरात उद्या 20 अमृत सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एनएचआय मार्फत यंदा यांच्यातर्फे 75000 अमृत सरोवर करण्याच्या प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणाले.

गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी त्यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जातोय त्यापैकी 90 टक्के काम गडकरींनी केली आहेत. रस्ते असतील, उड्डाणपूल असतील. अगदी देशाच्या सीमेपर्यंत काम केलंय. उत्तम रस्ते तयार झालेत, उड्डाणपूल तयार झालेत, दळणवळणाची साधने तयार झालीयत, याचं श्रेय नितीन गडकरींनाच द्यावं लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे. साधा माणूस आहे पण विकासाचा दृष्टीकोन आहे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा राष्ट्रीय शरद पवार यांच्यानंतरचा जर कोणी नेता असेल तर नितीन गडकरी आहेत,असंही राऊत यांनी म्हटलंय. गडकरी महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान काय हे नितीन गडकरींनी मागील सात वर्षात केलेल्या कामातून स्पष्ट दिसेल,असंही राऊत यांनी म्हटलं आहे. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड, निरोगी दिर्घायुष्य चिंतितो, अशा शब्दात राऊतांनी गडकरींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply