नागपूर शहर काँग्रेसचे महापालिकेत मटकाफोड आंदोलन

नागपूर : २७ मे – गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक वस्त्यामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, कचऱ्याची समस्या आणि महापालिकेत सुरू असलेला घोटाळ्याच्या विरोधात शहर काँग्रेसने महापालिकेत धरणे आंदोलन केले. पाण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या ओसीडब्ल्यूचे कंपनीचे कंत्राट रद्द करा अशी मागणी करत महापालिका कार्यालयात मटके फोडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली असून लोकांना २४ तास सोडा पण चोवीस मिनिटे पाणी मिळत नाही. अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे अनेक भागात लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला. महापालिकेत गेल्या पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता असताना शहराचा कुठलाच विकास झाला नाही असा आरोप कर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेत आंदोलन करण्यात आले. भाजपच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाईला महापालिका प्रशासन व भाजप जबाबदार असल्याचा आरोप यावेळी विकास ठाकरे यांनी केला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भेट घेऊन त्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply