सातबारा दुरुस्तीसाठी लाच मागणारा तलाठी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

गोंदिया : २५ मे – शेत जमिनीच्या सातबारा दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या तालाठ्याला लाचलुचवत विभागाने जाळ्यात अडकविले. ही सापडा कारवाई दुपार दरम्यान पानगाव येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली. मनोज दौलत कोहपरे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील शेतकऱ्याला शेत जमिनी विकायची होती. याकरिता शेतकऱ्याने शेत जिमनीचा सातबारा पानगाव तलाठी कार्यालयाकडून प्राप्त केला. मात्र सातबाऱ्यामध्ये जमीन ओलीत असल्याचे नमुद नसल्यामुळे 0.३२ हे.आर. जमिनीची रजिस्ट्री होऊ शकत नाही, असे अर्जनविसने सांगितले. मात्र फियार्दी शेतकऱ्याची शेत जमीन कालव्याच्या सिंचनाखाली येत असल्याने सातबाऱ्यावर ओलीत का नमुद करण्यात आले नाही, यासाठी तक्रारदाराने पुन्हा तलाठी कार्यालय गाठले.दरम्यान तलाठी मनोज दौलात कोहपरे याला सातबारामध्ये जमीन ओलीत असल्याची नमुद करण्याची विनंती केली. यासाठी तलाठी मनोज कोहपरे यांनी १ हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने या बाबीची तक्रार लाच लुचपत विभाग गोंदियाकडे केली.
प्राप्त तक्रारीची सहनिशा केली असता, तलाठी मनोज कोहपरे हा पदाचा दुरुपयोग करून साताबारा दुरुस्तीसाठी लाच मागत असल्याचे समोर आले. यावरून दुपारी पानगाव येथील तलाठी कार्यालयात सापडा रचण्यात आला. आरोपी तलाठी मनोज दौलत कोहपरे यांनी सातबारा दुरुस्ती करून देण्यासाठी तडजोडीअंती ८00 रुपये लाच मागितली.
दरम्यान तलाठी मनोज कोहपरेला पंचासमक्ष लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात आरोपी मनोज कोहपरे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोनि. अतुल तावडे, पो.हवा. मिलकीराम पटले, राजेंद्र बिसेन, संजय बोहरे, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष शेंडे, संतोष बोपचे, दीपक बाटबर्वे यांनी केली.

Leave a Reply