सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

इंजिनातील कोळसे

माजी मंत्री नटवरसिंग ह्यांचा टीव्हीवर इंटरव्ह्यू बघितला आणि डोळ्यावरची झापड उडाली. सत्तर वर्षे कॉंग्रेस ची हिंदू धर्माविरुद्ध, जैन धर्माविरुद्ध, सिख धर्माविरुद्ध, सर्व हिंदू जातींविरूद्ध फक्त एक समुदाय विशेष धार्जिणे धोरण अवलंबून देशाला Muसलमान बनविण्याच्या गर्तेत झोकण्याची कॉंग्रेसी परंपरा. काय सांगितले नटवरसिंगानी की त्यांच्या एका परदेशी दौऱ्यामध्ये रात्री बारा वाजता, नटवरसिंगांना त्यांनी सांगितले की चलो मेरे साथ, हम साथ चलते हैं! नटवरसिंग म्हणतात त्या रात्री आम्ही “बाबर च्या थडग्यावर” गेलो तिथे बाबरच्या मजारीवर इंदिरा गांधींनी बाबरला सांगितले की हिंदुस्तान की सल्तनत आज भी आपके वंशजो के हाथो महफुज है! आणि इथे नटवरसिंग चमकले.
हिंदू धर्माला अंधारात ठेवून Muसलमान धर्माचा प्रसार केला गेला. आरक्षणावर हिंदू जाती जाती मध्ये विभागला गेला. जाती जाती मध्ये विभागलेला हिंदू मतांसाठी आपापसात विखुरला गेला. हिंदू जन आपापसात एकमेकांविरुद्ध षड्डू ठोकून लढायला उभे केले गेले. देशाला Muसलमान बनविण्यासाठी अनेक चाली खेळल्या गेल्या. त्यातील एक चाल म्हणजे “बाबरी मस्जिद – अयोध्या मंदिर” तशी ही केस म्हणतात की ५०० वर्षे जुनी आहे. पण राम मंदिर हिंदू व्होट घेण्यासाठी वापरायचे कसे ते कॉंग्रेस जनांकडून शिकावे.
त्यावेळी कोर्टात जेव्हा केव्हा सुनावणी असे राम मंदिराबद्दल तर थातूरमातूर कारणांसाठी सुनावणी स्थगित केली जात असे आणि पुढील तारीख सहा सहा महिने पुढची देत राम मंदिराचा उपयोग राजकारणासाठी केला जात असे. ह्या तारखा इतक्या वाढत गेल्या की शेवटी आपले महाराष्ट्राचे सद्य मामु उद्धवसाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते की “भाजपा म्हणजे हम मंदिर वही बनाएंगे पर तारीख नही बताएंगे”! उद्धव साहेबांनी मान्य करुन टाकलं होतं की राम मंदिर बनवायचं तर फक्त भाजपा करु शकते. त्यानंतर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती की ज्यात संजय राऊत म्हणताहेत की जर राम मंदिर बनवायचं असेल तर पुनश्च मोदी सरकारला व्होट द्या. हा एकच् व्यक्ती आहे जो “राम मंदिर” बनवू शकतो. म्हणजे संजय राऊत सुद्धा मान्य करीत होते की मोदी है तो मुमकिन है! “राम मंदिर” बनविण्यात आमचे योगदान काहीच नाही.
हिंदू लोकांनी प्रचंड अनुदान दिले त्यावर शिवसेनेचा डोळा. हिंदू अनुदानित आस्थेवर शिवसेना, कॉंग्रेस, राकॉ सर्वांनी ताशेरे ओढले. Muसलमान मदरश्यांसाठी. बारा बारा कोटी अनुदान देणारी शिवसेना राम मंदिराला फक्त एक कोटी रुपये देते, आणि त्या करोड रुपयांचा गवगवा करते. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर काय भरभक्कम देणगी दिली असती राम मंदिरासाठी आणि मविआ सरकार देखील अस्तित्वात आले नसते. आदित्य ठाकरे म्हणतात तसे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपा बरोबर युती केली असती. “प्राण जाए पर वचन ना जाए” ही परंपरा निभविली असती. आदित्य ठाकरे ह्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडिओ ऐकावे. उगीच लांगूलचालन करून आपले मत मांडु नये.
मंदिराविरुद्ध उभे राहणारी वकिलावळीत ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल – हिंदू विरोधात कामे करणारा पण नावाने “कपिल सिब्बल” जन्माने हिंदू जातीने खत्री पण कॉंग्रेस शी एकनिष्ठ म्हणून हिंदू विरोधी कारवायांमध्ये सर्वांची वकिलपत्रे घेऊन भारतविरोधी गुन्हेगारांना सुटकेचा किरण दाखविणारा कपिल सिबल.” हिंदू नेच् हिंदूचा घात केला” ही म्हण सार्थ करणारा स्वार्थी हिंदू. तर राम मंदिराची केस अक्षरशः पुढील तारखा सहा सहा महिने ढकलणारा कपिल सिब्बल. NRC, CAA अशा मुद्द्यावर संसदेत अमित शहांना घेरणारा कपिल सिब्बल. ह्याच्या बद्दल एक किवदंती खुप व्हायरल झाली होती की “मी जीवंत असेपर्यंत राम मंदिर बनू देणार नाही” असा प्रण ह्याने घेतला होता असे सोशल मिडिया वर खुप गाजले होते. खरे की खोटे माहिती नाही. पण आतंकवादी, Muसलमान गुन्हेगारी च्या केसेस, Muस्लिम धार्जिण्या केसेस आल्यात की बुवा बाह्या सरसावून सज्ज होतो आणि कोर्टात धावत जातो.
सांगायचे तात्पर्य शिवसेना, कॉंग्रेस, राकॉं , कम्युनिस्ट पक्ष, कुठल्याही पक्षानी “राम मंदिर” मुक्त व्हावे, तिथे मंदिर बनावे ह्यासाठी धावपळ केली नाही, आस्था दर्शविली नाही. राम मंदिर होणार एवढे गाजर निवडणुकांपुरते हिंदू मतांसाठी वापरले जायचे आणि मग पाच वर्षांसाठी हा मुद्दा पुढल्या मतांसाठी बंदिस्त गाडला जायचा.
पहिल्या पाच वर्षात मोदी सरकारची देखील दमछाक झाली, राम मंदिर हा मुद्दा सोडवायला. कोर्टापासून ते सर्व ठिकाणी कॉंग्रेस ने आपली फिल्डिंग सेट केलेली. मात्र दुसऱ्या पर्वात सर्व अडचणींवर तोडगा काढत मोदी सरकारने खराखुरा निकाल येण्यासाठी वास्तविक कागदपत्रांच्या आधारावर अयोध्या जिंकून आणली आणि मग अयोध्या प्रकरणाचे क्रेडिट घेण्याची सर्व पक्षात अहमहमिका सुरू झाली.
साहेबांनो ! धोनी च्या नेतृत्वाखाली जिंकलेले वर्ल्ड कप बघितलेत का? धोनी वर्ल्ड कप जिंकवून देतो पण सेलेब्रेशन मध्ये तो नसतो. एकदा कप जिंकला की बाकी खेळाडू मॅचेस मध्ये खेळणारे न खेळणारे, वर्ल्ड कप ला हात लावायच्या लायकी चे, बिगर लायकीचे सर्व मंडळी सेलिब्रेट करीत असतात. बसं! असेच् झाले मोदींनी अयोध्येचा वर्ल्ड कप आपल्या नेतृत्वाखाली जिंकवला आणि मग क्रेडिट घेण्याची अहमहमिका सुरू झाली.
त्यात आपले सद्य मामु म्हणाले की शिवतिर्थाची एकमुठभर माती आम्ही अयोध्येत दिली आणि दुसऱ्या वर्षी अयोध्या मुक्त झाली. नुसती मुक्त नाही झाली तर आशिर्वादपर मी मुख्यमंत्री झालो. आजचा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस, मोदीच्या नावावर सीटा जिंकणारा आणि वेळ आल्यावर पलटीमार मुख्यमंत्री. चला हवा येऊ द्या फेम साळवे ने ह्याच्यावर जबरदस्त तंज कसला होता. मामु आणि संजय राऊत ह्यांच्या उपस्थितीत – नापास झालो तर काय झाले? आमच्या तिघांचे गुण मिळून ………. पास होणाऱ्या पोरापेक्षा जास्त आहेत नं! आठवला ! त्यावेळी दोघांचे चमकलेले चेहरे ! आठवत आहेत. शिवसेनेचा मुळात मुद्दा हिंदुत्वाचा पण चुकीचा एक निर्णय तुमची संपूर्ण दिशा बदलवते आणि तेच् झाले.
भाजपा मध्ये पन्नास टक्के हिस्सेदारी घेऊन फडवीसांच्या मुख्यमंत्री पदाला आव्हान दिले गेले, अमित शहांचे नाव गोवून राजकारण खेळल्या गेले आणि फक्त अहंकारापोटी रडीचा डाव खेळल्या गेली. पाच वर्षाचे मुख्यमंत्री पद भोगून झाले की पायउतार झाल्यानंतर जन्मभर मांडलिक बनून राहणार, ही दूरदृष्टी न ठेवता हव्यासापोटी शिवसेनेची हिंदुत्ववादी तत्वांना कायमची तिलांजली देऊन आता शिवसेना Muसलमान धार्जिणी शिवसेना बनली मग गंमत अशी की हिंदू मतदारांना कळले की शिवसेना पुर्वीची नाही. आणि शांतीदूत तर शिवसेनेला मतं देणार नाही. जे काम भाजपा करू शकली नाही ते काम शरद पवारांनी केले आणि शिवसेनेचे खरे रूप जनतेसमोर आले. आता शिवसेनेचे मार्ग खुंटले. समोर मार्ग दिसत नाही पण सुंभ जळाला तरी पिळ जात नाही. मग सुरू होतात अयोध्या चकरा… “रामा तुझे कोमल नाव घेता संतोष वाटे बहुफार चित्ता” . खरे रामभक्त खोटे रामभक्त – सगळे मनाचे खेळ फक्त.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मनसे पक्षप्रमुख दोघे ही राजकारणात धडपड करताहेत, आपापला जम बसवायचा. दोघांचा धनी एकच्.आणि दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध. राजकारणातील चतुर खेळींचे त्रेराशिक बघा. उगाच नाही ह्यांना महाराष्ट्राचे चाणक्य म्हणत, उगाच नाही ह्यांना जाणता राजा म्हणत. साहेबांनी शिवसेना संपविता संपविता मविआ सरकारची पार सद्दी संपली. एवढा गर्दा उडवता उडवता हिंदू मतांचे झालेले भाजपाकडे झालेले धृविकरण हा मोठा डोकेदुखी चा मुद्दा.
आता मुख्य मुद्दा होता की धृविकरण झालेली मते तुडवायची कशी? आपल्या पाल्यात आणायची कशी? राजकारणात सक्रिय होण्यासाठी धडपडणारा दुसरा पुतण्या काकांनी मार्केट मध्ये उभा केला. आपले नाव गुपचूप आणि भोंग्यावर भाषण सभा गजब गाजली. लगेच एक दोन सभांमध्ये प्रती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांना दिसायला लागले. काकांनी डाव असा टाकला की इंजिन मध्ये कोळसे असे टाकले की इंजिनानी दिलेला भोंगा जणू भाजपाचा का काय? शिवसेनेवर तसूभर आगपाखड नाही! म्हणजे परत भाजपा- शिवसेना सांधणारा दुवा तर नाही. सर्व सामान्य जनतेच्या मनात हल्लकल्लोळ माजविणारी मनसे ची सभा झाली. हिंदू मतदार परत विचार करायला लागला. भाजपाकडे झालेले हिंदू मतांच्या धृवीकरणाची मतांना तडे गेले. प्रती बाळासाहेब ठाकरे मिळाल्याच्या उन्मादात मतदार वाहावत गेला. शिवसेना ह्या प्रकाराने चकित – ह्यांना समजायला शंभर वर्षे लागणार. राजकारणाची अ ब क ड ई गिरवणारा मुख्यमंत्री अजूनही घरात. ह्याला काय कळणार काय गेम असतो राजकारणात. मुख्यमंत्री म्हणजे सर्वांना घेऊन चालायची कुवत हवी. पण आमचा मुख्यमंत्री पण सकते मे! अरे! थोडे थोडके जे काही साठविलेले हिंदू मत होती, ह्या चुलत भावाने त्यालाही सुरुंग लावलेला. हिंदू मतांची निसटलेली परिस्थिती भाजपा अवलोकुन राहिलेली. इंजिनात कोळसे कोणी टाकले? माहिती असले तरी सर्वसामान्य जनात तर आता इंजिन बहुतेक भाजपा चेच् असा वणवा पेटवलेला.
साहेबांनी खेळलेली खेळी अप्रतिम, चार कोळशात हिंदू मते पलटलेली. प्रत्येक सभेत हिंदू मतांना पाय लागलेले. भाजपा पण माहिती असून भांबावलेली. ह्या इंजिनाला रोखायचे कसे? इंजिनाने वेग घेतलेला. हवे तसे पाहिजे तेव्हा इंजिनात कोळसे पडायला लागले. आणि इथे एक निर्णय चुकला. ज्यावेळी इंजिन प्रचंड वेगाने चालते त्यावेळी एक थांबा विचाराचा तो बनता है! सुसाट निघाले की अफाट यश मिळत नाही. झालेल्या सभांचे यश बघता हातात येणारी मतं बघता, विरोधी पक्ष काय खेळी खेळत असेल ह्याचा आचार विचार न करता. साहेबांनी इंजिनाचे तोंड थेट अयोध्ये कडे वळविले नी आतापर्यंत अचंबित भाजपाला प्रत्त्युत्तर द्यायची दिशा गवसली. राज साहेबांच्या भाषणांची उंची अशी की भाजपाला त्यांच्या हो ला हो लावण्याशिवाय पर्याय नव्हता.
म्हणतात ना करावे तसे भरावे. जसे महाराष्ट्रात तुम्ही शेर. उत्तर प्रदेश, बिहार लोकं महाराष्ट्रात येवून पोट भरतात हे राज साहेबांना मान्य नाही. किंबहुना मराठा कार्ड खेळण्यासाठी उत्तर प्रदेशातील नागरिकांचा महाराष्ट्रात पदोपदी अपमान केला गेला. त्यांना मारझोड करण्यात आली. मराठी माणसांची कामे हिसकावून घेतात म्हणून. मराठी माणूस जी कामे करू शकत नाही, तीच् कामे ही मंडळी वाजवी पैशात करीत असतात. एका दिवसात ह्या मंडळीना आपल्या गावी पाठवा महाराष्ट्रातून आणि मग बघा! संपूर्ण महाराष्ट्र ठप्प पडेल. भाजी विक्री पासून, ज्युस, इलेक्ट्रिशियन, किरकोळ कामे करणारी ही मंडळी. पैसेवाली नाही. पण जितका मिळेल तितके काम पार पाडायचा ह्यांचा धडपड्या स्वभाव. अशा खालच्या गटातील उत्तर प्रदेशियांचे घाणेरड्या स्तरावरील राजकारण खेळले गेले आणि ह्याची परिणीती आज चांगल्या चाललेल्या मौसम मध्ये आलेल्या इंजिनाच्या गतीला ब्रेक बसला. राज ठाकरे जर अयोध्येत लाखावर समर्थक घेऊन आलेत तर………. पुढल्या निवडणुकांची दिशा बदलवेल हे न समजण्याइतकी भाजपा खुळी नाही. दुसऱ्या पुतण्याला समोर करून हिंदुत्वाच्या अजेंडा भाजपा हातून हिसकावण्यासाठी इंजिनात कोळसे कोण टाकतंय हे समजण्या इतकी भाजपा नक्कीच दुधखुळी नाही. राज ठाकरे म्हणजे मस्त मवाल चाल. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती! निर्भिड व्यक्तिमत्त्व, खट व्यक्तिमत्त्व. कोणाची क्षमा न वागणारं व्यक्तिमत्त्व. हे काय भाजपा जाणत नाही.
राज ठाकरे चे चाललेल्या हिंदुत्ववादी अजेंड्याला प्रत्त्युत्तर द्यायचे नी राज ठाकरे हे देखील झुकु शकतात ही जबरदस्त खेळी तयार केली गेली.
साहेबांनो – राम लला सर्वांचा! रोखायची कोणाची ताब? तुम्ही कोण ठरविणारे? रामाला ठरवु द्या नं! पण पुर्व संचित आडवं आलं. ज्या उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम निवास करतोय! ज्या रामाच्या मंदिराला तुमचा तसुभर हातभार लागला नाही! त्या रामाच्या मंदिराचा उपयोग तुम्ही राजकारणासाठी करताय काय?
तुम्हाला काय वाटते! योगी आदित्यनाथ ह्यांची एकसुद्धा प्रतिक्रिया नाही. योगी आदित्यनाथ म्हणतील की राज ठाकरे चले जाव! शक्यच् नाही. पण घोडदौडीचा लगाम खेचणे आवश्यक. म्हणून योगी आदित्यनाथ पण झाल्या प्रकरणात सहभागी. मौसमात वेग घेतलेल्या इंजिनाला ब्रेक लावणे आवश्यक होते. हिंदू मतदारांच्या मनात शिरलेल्या भाजपा प्रणीत राज ठाकरे ला सर्वांसमोर आणणे गरजेचे होते. राज ठाकरे भाजपा खेळाडू नाही, हा संदेश सर्वांना देणे गरजेचे होते. त्यासाठी एक तर राज ठाकरे ला “क्षमायाचनेवर” प्रवेश किंवा या उत्तर प्रदेशात लढायला. सर्व सीमांवर भाजपा खासदार भुषण शरन सिंग ला मैदानात उतरविण्यात आले. “माफी माग नाहीतर पाय ठेवू देणार नाही”. मनसेचा पुर्ण माज उतरवला एका झटक्यात. राज ठाकरे माफी मागणार नाही हे तर जगजाहीर. मागितली तरी जय भाजपाचा आणि नाही मागितली तर जय भाजपाचा. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्याचे जाहीर केले आणि भाजपा ने सुटकेचा निःश्वास सोडला.
इतके सगळे रामायण घडुन गेल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणतात की राज ठाकरे ह्यांनी आम्हाला मदत मागितली असती तर कदाचित सफल दौरा – अयोध्या दर्शन झाले असते. साहेबांना पण किनी फिरक्या घ्यायची सवय. त्यातल्या त्यात मनसे असेल तर अजून उधाण. आता रेकॉर्ड ब्रेक जमानती जप्त वाला पक्ष म्हणजे शिवसेना आपल्या उत्तर प्रदेशातला.
झाल्या प्रकारावर एवढे सारे पाणी वाहून गेले पण आपले मुख्यमंत्री मात्र अजुनही झाल्या प्रकारावर अ ब क ड ई गिरवताहेत! कदाचित विचार करत असतील आदु बाळाला (आपल्या समोर आपला मुलगा बाळंच् असतो. मिनिस्टर जगासाठी बापासाठी त्याचं छकुलं पोरगंच् असतं) योगी च्या राज्यात पाठवायचे का? १० तारखेला !! कारण योगी ब्रम्हचारी आणि आदु तर ……

भाई देवघरे

Leave a Reply