आमचे पहिले प्राधान्य जनतेला – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : २२ मे – केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी लोक पहिलं प्राधान्य आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. दुसरीकडे हा निर्णय जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितातरमण यांनी यापूर्वी करकपात न केलेल्या राज्यांना विशेष आवाहन केलं होतं. अर्थमंत्र्यांच्या आवाहनानंतर बिगरभाजपशासीत राज्यांवरील दबाव वाढला आहे. केरळनं देखील तातडीनं कर कपात जाहीर केली आहे.
आम्ही नेहमी लोकांचा पहिल्यांदा विचार केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आजच्या निर्णयामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात होईल. या निर्णयामुळं विविध क्षेत्रांना दिलासा मिळेल, असं मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे १२ गॅस सिलिंडरवर २०० रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. यामुळं जवळपास या योजनेच्या ९ कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यामुळं केंद्र सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात बोलताना उज्ज्वला योजनेचा कोट्यवधी भारतीयांना फायदा झाला आहे. विशेषत: महिलांना आजच्या निर्णयाचा फायदा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Reply