सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

धर्मसंमत निकाह – स्वार्थसंमत मदिरा – कायदासंमत भ्रष्टाचार

नायजेरिया – आफ्रिका खंडातील एक श्रीमंत देश. १९५६ साली इथे उच्च प्रतीचे “Brent” क्रुड ऑईल मिळाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नायजेरिया चे वजन वाढले.
१९८०-१९८२ पर्यंत नायजेरिया हे जगातील फार मोठे प्रस्थ होते. नायजेरिया मध्ये त्यांच्यापाशी पैसा नाही, असा विद्यार्थी वर्ग ज्यांना ते आर्थिक दृष्ट्या पिछडलेला वर्ग शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जात असे. सबब – स्वतः च्या मायदेशातील शिक्षण परवडत नसल्याने ही विद्यार्थी मंडळी अमेरिकेत रवाना होत असे. १९८० – १नायरा ( नायजेरिया चे चलन) = ४.७७८८ अमेरिकन डॉलर. ही महत्ता होती नायजेरिया चलनाची.
अनेक कारखाने होते. येथील कापड प्रसिद्ध होते. शिक्षण संस्था, शिक्षण पद्धती प्रगत होते. भारतातील अनेक सर्व स्तरीय शिक्षक नायजेरिया मध्ये नौकरी करायला जात असत. विविध संस्थांमध्ये शिकवित असत. भारतीय स्पष्ट उच्चाराचा त्यांना अप्रुप आजदेखील आहे. स्पष्ट आणि शुद्ध उच्चार सर्व जगात भारतीयांचे. म्हणून भारतीय शिक्षकांना विशेष मान. मात्र भारतीय जेव्हा इंग्लिश सिनेमा बघतात, तेव्हा त्यांचे बरेच उच्चार आपल्याला समजत नाहीत कारण त्यांचे तोंडातल्या तोंडात गोल बोलणे किंवा ब्रिटिश लोकांना इंग्रजी बोलताना बघितले की कीव करावीशी वाटते. की ही मंडळी स्वतः च्या मायबोलीचे स्पष्ट उच्चारण करु शकत नाही आणि आपल्याला एखादा शब्द कळला नाही तर ब्रिटिश बुवा आनंदित होतो की भारतीयांना आपले इंग्रजी कळत नाही म्हणून. अरे! ब्रिटीशर बाप्प्या! पहिले तोंडाने गोल गोल बोलणे बंद कर. पहिले आपले तोंड साफ बोलायला पाक कर. मग घे भारतीयांच्या इंग्रजी ची कसोटी. तुमच्या देशात येऊन उगाच नाही भारतीय मंडळी बॅरिस्टर बनली. तुमच्या भाषेत शिकुन. आमचा शशि थरूर बघ, मग ये चॅलेंज स्विकारायला. पण तरीही मार्ग काढून तोडगा काढुन सर्व जगावर राज्य करणारी ब्रिटिश जमात.
इंग्रजी भाषा शाळेत शिकत असताना, आम्हाला नेहमी इंग्रजी भाषा बरोबर येत नाही म्हणून हिणवले जायचे की बघ इंग्रजाचा चार वर्षाचा मुलगा सुद्धा किती फाड फाड बोलतो! आणि तुम्ही आठ वर्षाचे अजुन what is your name and what is my name ! शिकताय. एक दिवस ह्या वाक्याची चिड आली आणि आम्ही पण ठोकुन दिले मॅडमला, की त्या ब्रिटीश मुलाला मराठीत विचारा,”तुझे नाव काय आहे?” समजते का पाहू! त्यानंतर मॅडम नी आम्हाला परत आमच्या वर्गात हा प्रश्न उपस्थित केला नाही. भारतीयांची दुसऱ्या भाषेला, धर्माला देण्यात येणारी प्राधान्यता नडली आणि आम्ही आमच्या सनातन संस्कृतीचा अनादर केला. अन्यथा भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांनी “ज्ञानवापी” सारखा मुद्दा उपस्थित व्हायला नको होता. तेजो महालय, ज्ञानवापीचा नंदिकेश्वर, विष्णू स्तंभ, मथुरा, काशी ही पवित्र हिंदू मंदिरे तर आतापर्यंत हिंदू देवीदेवतांच्या पुजे साठी मोकळी व्हायला हवी होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूमुळे झालेली हानी आजतागायत हा देश भरून राहिला आहे हेच् खरे!
Coming back to Nigeria – ब्रिटीशर्स नी १८५१ मध्ये लागोस शहर हातात घेतले. तिथपासून पारतंत्र्यात सुरू झालेला प्रवास १९६० ला स्वतंत्र झाला. मात्र नायजर डेल्टा परिसरात ब्रिटिश पेट्रोलियम “Shell” कंपनीचे वर्चस्व आज देखील क्रुड ऑईल साठी आपला हक्क ब्रिटिशर्स राखून आहेत किंबहुना अबाधित हक्क गाजवित आहेत. त्यातून सुद्धा प्रचंड राजस्व कमवित नायजेरिया डौलाने स्वाभिमानी वाटचाल करीत होता. सर्व जगतात आपला डंका पिटत होता. मात्र पेट्रोल, ऑईल साठी वेडी पिशी अमेरिका नायजेरिया मध्ये अवतरली आणि नायजेरिया चे पतन सुरु झाले.
इ.स. १९८५-१९९३ इब्राहिम बाबांगिडा ने सत्ता सांभाळली नी नायजेरिया च्या अंध:पतनाची सुरुवात झाली. अमेरिका एकदा देशात शिरली की उच्च पदस्थ लोकांना विकत घेण्याचा कार्यक्रम करते. त्याप्रमाणे नायजेरिया मध्ये “इब्राहिम बाबांगिडा” चे काळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आणि त्यानंतर नायजेरिया चे अध:पतन आजतागायत सुरू आहे. आज अधिकृत चलनानुसार १अमेरिकन डॉलर = ४१५.२८४३५ नायजेरियन नायरा इतका अध:पतन रेट आहे.
ही मंडळी आता स्वतः चे घर भरण्यासाठी राज्य करतात. अफाट भ्रष्टाचार माजवतात. इब्राहिम बाबांगिडा ने तर USD 12.5 Billon चा हिशोब देण्यास नकार दिला आणि त्याप्रमाणे कायदा मंजूर करण्यात आला जेणेकरून कुठलाही राजकारणी भ्रष्टाचारात फसू नये.
असे म्हणतात भारतावर देखील अमेरिकेचे वर्चस्व होते. भारतातील मनमोहन सिंग चे काळात, मंत्रीवर्य अमेरिका तय करीत असे. भारत फक्त लागू करीत असे. आमच्या इथे देखील सोनिया गांधींनी आपले उत्पन्न सार्वजनिक करणार नाही अशी भुमिका घेतली होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मासिकांमध्ये तिचे नाव जगातील चौथी श्रीमंत महिला यादीत समाविष्ट करण्यात आले होते. भारताचा स्वाभिमान जागृत झाला तो २०१४ नंतर. मोदी आल्यानंतर. तो पर्यंत भारतात देखील कॉंग्रेस पक्ष शांतीदूत समर्पित छुपा अजेंडा चालवीत होती. छुपा एवढ्यासाठी की हिंदू लोकांना अंधारात ठेवून हिंदू मत घेवून सत्तेत यायचे आणि हिंदू धर्माला खच्ची करण्याचे राजकारण करायचे. मात्र मोदी सत्तेत आले आणि अयोध्या राम मंदिर घेऊन आले. आता एक एक मस्जिद बदलेल मंदिरांमध्ये. आशा करुया नवीन भारत उभा होईल.
मात्र नायजेरियाला मोदी सारखा शासक मिळाला नाही. आणि नायजेरिया चे तारु भ्रष्टाचारात भरकटत गेले ते आज ही जागेवर आले नाही. भ्रष्टाचारात भरकटंत आहे. निवडणुका असल्या की नायजेरियातील”बोको हराम” ही आतंकवादी संघटना जागृत होते आणि “मुहम्मदु बुहारी” ला अध्यक्षपदी विराजमान करुन आराम फर्मावते. नायजेरिया ला आज मोदी सारख्या नेत्याची गरज आहे.
भ्रष्टाचार कसा असावा? त्याची कारणमीमांसा काय? ह्या मंडळीला कितीही बकणा भरा! पैसा पुरत का नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर त्याचे उत्तर एकच. नियत, परिस्थिती, वाईट संस्कार आणि बेइमानी.
मी नायजेरियात मध्ये एका भारतीय प्रतिष्ठित कंपनीत रूजू झालो. मिळालेल्या कामाची यादी बघत होतो आणि भ्रष्टाचार म्हणजे काय ह्याचे उदाहरण म्हणजे ही छोटीशी गोष्ट.
आपल्या इथे जे इलेक्ट्रिक चे मिटर लावतात. ज्याची किंमत ५०० रुपये आहे. ते भारतीय मिटर नायजेरिया मध्ये मिळालेल्या कंत्राटानुसार भारतीय चलनात त्याची किंमत ८५००० रुपये होती आणि असे एकूण एक लक्ष मिटर लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रचंड फायद्याचे अफाट कंत्राट. आमच्या कंपनी मध्ये त्या काळात पैशाची कमी कधीच् नव्हती.
आमचा सीईओ “योला” गावचा “अहमदु” ला दरमहा सोळा लक्ष नायरा पोचविण्याचे काम माझ्याकडे असायचे. मी त्याच्याकडे जाणार म्हटले की अपना थाटबाट अलग. बाहेर कितीही वजनी मंडळी बसली असो. माझ्या नावाची चिठ्ठी आत गेली की लगेच मला बोलाविले जायचे. पाच दहा मिनिटे लागणार असतील तर वेटिंग हॉलमध्ये फक्त मला लगेच गरमागरम कॉफी बिस्किटे पाणी दिले जायचे. जेणेकरून तिथल्या जमलेल्या सर्वांना जाणवायचे की हा कोणी मोठा वजनी माणुस आहे.
अहमदु ला चार बायका आणि २८ अपत्ये. आणि आमचा कंपनीचा ऍडमिन सलमान चा स्वतः चा नंबर २७ आणि त्याला एकुण भावंड ४७, सलमान मिळुन एकुण ४८ . त्यामानाने आमचा सीईओ अहमदु बराच मागास म्हणायचा.
एक दिवस अहमदुच्या ऑफिसला गेलो होतो. म्हणाला वेळ आहे का? आपण नवीन सबस्टेशन साठी जागा बघायला जावून येऊ. अशा संधी कोणी सोडत नसतो. मी लगेच तयार झालो. म्हणाला चल माझ्याच् गाडीने जाऊ. एक पाच दहा मिनिटात आम्ही त्याच्या गाडीने मार्गस्थ झालो. ऊन मी म्हणत होते. आम्ही वातानुकूलित गाडीत बसलो होतो. एका सिग्नल वर आमची गाडी थांबली आणि एक काळी नायजेरियन, घामाघूम झालेली ८-१० वर्षाची मुलगी हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन सुसाट आमच्या गाडीकडे निघाली. ती गाडीपाशी आली तो अहमदु मला म्हणतो अरे! तिच्याकडून अख्खा पाण्याचा क्रेट विकत घे! मी तिच्याकडून पाण्याचा वीस बाटल्यांचा क्रेट विकत घेतला. सीईओ साहेबांना अशा छोट्या छोट्या गोष्टी विचारायच्या नसतात. पाण्याच्या बाटल्यांची किंमत आणि आपला धंद्याची किंमत. कोणालाही कळेल, मी पण ह्याला विचारलं नाही. पाण्याचा एक क्रेट विकत घेतला.
बरे! सीईओ ला पार्टी द्यायची तर ओली पार्टी. पठ्ठा प्रत्येक वेळी सोबत नवीन बाईल घेऊन येणार. ही माझी चौथी बायको, आज ही तिसरी बायको वगैरे वगैरे.. करतो आपल्या धर्माचे पालन. केल्या त्याने धर्माप्रमाणे चार बायका बिघडलं कुठे? पण पिताना मात्र – फुकट मे मिली तो पी ली! पिताना मात्र ह्याचे दारुचे ब्रॅंड ठरलेले. इथे मात्र धर्म वगैरे काही नाही. म्हणजे सोयिस्कर रित्या धर्म पाळणारी ही जमात. एका साईटवर तुर्कस्तान चे पण पार्टी करणारे शांतीदूत आमचे कंत्राटदार बघा स्वतः तर घेतच् असत आणि माझ्या सर्व साथी लोकांना डगमग डगमग करीत परत पाठवित. इतके दोलायमान होतपर्यंत मदिरा, अपेयपान करणारी ही जमात धर्माप्रमाणे चार बायका प्रत्येकी पण अपेयपान धर्मसंमत नसले तरी चालते. असा सोयिस्कर पणे धर्म पाळणारी मंडळी.
तर पाण्याच्या बाटल्यांचा क्रेट विकत घेतल्यावर, हिरवा सिग्नल झाला नी आमची गाडी पुढे निघाली. मी पाण्याबद्ल काहीच् बोललो नाही ह्याचे अहमदु ला अप्रुप वाटले नी अहमदु ने स्वतः ची टेप सुरू केली. म्हणाला ही माझ्या तिसरी बेगम – ती नाही का त्या दिवशी आपल्या पार्टीला आली होती! मी मनात म्हटले बावा! तीने जेवताना सुद्धा फक्त तोंड उघडण्यापुरता बुरखा उचलला होता. मी तिला काय ओळखणार? तुझ्या एका ही बायकोला मी ओळखु शकत नाही!
तर ही त्या तिसऱ्या बेगमची पाचवी मुलगी “ईनाया” नशीब साहेबाला नावं माहिती आहे. नाहीतर आमचा ऍडमिन, तो! एकंदर ४७ भावंड वाला. सांगायचा की त्याच्या बापाला मुलांचे नावं पण आठवत नसे.
पोरं ही अल्लाची देन आहेत. त्यांना जगात येण्यापासून रोखणार कसे? ज्याची जशी कुवत तसे मी पोरांना ठेवतो. माझ्या २७ मुलांपैकी फक्त सहा पोरं शाळेत जातात आणि दहा मुलं अशीच् बालपणापासून काही ना काही कमाई करून घरी थोडा बहुत पैसा आणतात. काय ठेवलंय शिक्षणात?
माझा सीईओ साहेब तो! महिन्याकाठी सोळा लक्ष नायरा वरचे कमावणारा! त्याच्या उच्च विचारांत हो ला हो मिळविण्याशिवाय मला ही गत्यंतर नव्हते.

भाई देवघरे

Leave a Reply