संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती

दुबई : १५ मे : संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जायेद अल नाह्यान यांच्या निधन झाले. त्यानंतर सात अमिरातींच्या अबुधाबीतील अल मुश्रीफ महालात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या घराण्याकडे संयुक्त अरब अमिरातीची वंशपरंपरेने सत्ता आहे. १९७१ मध्ये या सात अमिराती एकत्र येऊन स्वतंत्र देशनिर्मितीनंतर अवघ्या तिसऱ्यांदा सत्तेचा खांदेपालट झाली.

Leave a Reply