पत्नीवर अँसिड हल्ला करून साळ्यावर केले ब्लेडने वार

नागपूर : १५ मे – शिवणकाम व सोन्या-चांदीचे एकत्रित दुकान असलेल्या पतीने आपल्या पत्नीवर अँसिड हल्ला आणि साळ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना वेलतूर येथे घडली. विनोद नामदेव विनकने (वय ४0, रा. नवेगाव पुनर्वसन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वेलतूर येथे फिर्यादी भारती विनोद विनकने (वय ३६, रा. नवेगाव पुनर्वसन) आणि आरोपी विनोद नामदेव विनकने हे दोघेही पती-पत्नी असून, वेलतूर येथे पत्नीचे शिवणकाम तर पतीचे सोन्या-चांदीचे एकत्रित दुकान आहे. दुकानात पत्नीने पतीला पैशांबाबत विचारणा केली असता पतीने दुकानात ठेवलेले सोने साफ करण्याचे अँसिड इजा करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या अंगावर फेकल्यामुळे महिलेच्या अंगावर इजा होऊन काळे डाग पडले. त्यामुळे सदर घटनेची माहिती महिलेने आपल्या भावाला फोनवरून दिली. महिलेचा भाऊ रात्री ९ वाजतादरम्यान नवेगाव पुनर्वसन येथे आला. घटनेबाबत जावयास विचारले असता जावयाने साळ्यावर ब्लेडने मान आणि पाठीवर वार करून जखमी केले. फिर्यादी भारती विनोद विनकने यांच्या तक्रारीवरून वेलतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितेश डोरलीकर, प्रदीप खिल्लारे करीत आहे.

Leave a Reply