राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही – बाळा नांदगावकर

मुंबई : ११ मे – 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. याचवेळी त्यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर निशाणा साधला. या भोंगा प्रकरणामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी आली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मनसेनेचे नेते नांदगावकर म्हणाले की, “मला भोंग्याच्या विषयावरून धमकीच पत्र आलं आहे. मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनाही धमकी दिली आहे आणि जिवे मारण्याची धमकी असल्यामुळे मी काल पोलीस आयुक्त यांना भेटलो. क्राईम कमिशनर यांना ते पत्र त्याची खरी प्रत दिली आहे. पुढे पोलीस काय कारवाई करतात ते बघू.”
धमकीच पत्र दिल आहे. हा जो अजान विषय त्याविषयी लिहिलेल आहे. मी एवढंच सांगतो बाळा नांदगावकर ठीक आहे. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. त्यांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारने त्या जर केंद्र सरकारनेही दखल घ्यावी.” असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
दरम्यान, मंगळवारी (10 मे) राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, “आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. सत्ता येते आणि जाते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा. महाराष्ट्र सरकारने मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.”

Leave a Reply