रानगव्याच्या हल्ल्यात इसम जखमी

चंद्रपूर : ८ मे – पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील एक व्यक्ती तेंदू संकलनासाठी गेला असता त्याच्यावर रानगव्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना कसरगट्टा बिट क्रमांक ९२ येथे घडली. यावरून जंगलालगतच्या गावातील जंगली प्राणी व मानवीजीव संघर्ष अजूनही कायम असल्याचे दिसून येते. ऋषी देवगडे( वय ५0) असे जखमीचे नाव असून तो बोर्डा बोरकर येथील रहिवासी आहे.
ऋषी देवगडे सकाळी ८ वाजता तेंदू संकलनासाठी कसरगट्टा बिट क्रमांक ९२ येथे गेला असता रानगव्याने मागून हल्ला चढवला. या हल्ल्यात तो हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले. परंतु इसम गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

Leave a Reply