तेंदूपत्ता संकलनाला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर : ६ मे – तहसील अंतर्गत येणाऱ्या नवेगाव हंडेस्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम (वय ६0) हा सकाळी ७ वाजता तेंदूपत्ता तोडण्याकरिता शिवारातील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघ दबा धरून बसला तेव्हा हल्ला करून ठार केले. शेजारी तेंदूपाने तोडणार्यांच्या लक्षात येताच गावात माहिती देण्यात आली. लगेच वन विभाग नागभिड माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले. शवाचे शवविच्छेदन करून शव कुटुंबीयांना देण्यात आले असून, वन विभागाच्यावतीने अंत्यसंस्कारकरिता सानुग्रह अनुदान देण्यात आले. यानंतर शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply