संपादकीय संवाद – इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव प्रतिष्ठित कारण्यासारही डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढाकार घ्यावा

देशातील अनेक शहरांची प्राचीन नावे तत्कालीन राज्यकर्त्यांनी बदलून आपल्या सोयीची नावे दिली होती, केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर बदललेली नावे हटवून मूळ नावे देण्यासाठी पाऊले उचलली गेली आहेत. मात्र या कामाला उशीर का होतो आहे? असा सवाल करत भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वपक्षियांवरच आगपाखड केली आहे.
डॉ. स्वामी यांचा संताप अनाठायी म्हणता येणार नाही,आपल्या देशावर इसवी सणाच्या आठव्या शतकानंतर परकीयांची जी आक्रमणे झाली, आणि दीर्घकाळ परकीयांची राजवट राहिली, त्यामुळे परकीय राज्यकर्त्यांनी अनेक शहरांची मूळ नावे बदलून त्यांना आपल्या सोयीची नावे दिली होती. ही नावे परकीय राजसत्तेची आणि गुलामगिरीची प्रतीके म्हणून ओळखली जात होती. त्यामुळेच ही नावे बदलावीत आणि मूळ नावे दिली जावी अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. आता भाजपचेच सरकार आले असल्यामुळे हळूहळू या कामाला सुरुवात झाली आहे, मात्र ते काम गतीने व्हावे असा डॉ. स्वामींचा आग्रह दिसतो आहे. त्यावरही विचार व्हायला हवा हे सुचवावेसे वाटते.
आपल्या देशात अनेक शहरांची नावे तर अशी बदलली गेलीच पण त्याचबरोबर अनेक नवे रस्ते, नव्या वस्त्या, नवे चौक यांनाही अशी परकीय गुलामीची आठवण करून देणारी नावे दिली गेली. इंग्रजांनी या बाबतीत पुढाकार घेतला होता, नंतर देशातील काँग्रेस सरकारनेही अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे अशी गुलामगिरीची आठवण करून देणारी नावे दिली गेली. अकबर, औरंगजेब, हुमायूं, शहाजहान ही सर्व परकीय राज्यकर्त्यांची नावे आजही राजधानी दिल्लीतील वेगवेगळ्या रस्त्यांना दिली गेलेली दिसतात.. त्यातील काही नावे बदलली मात्र अजून खूप नावे बदलायची आहेत. त्यासाठी पाऊले उचलली जायला हवी.
अनेक शहरांना पूर्वी वेगळी नावे होती, दिल्लीचे नाव पूर्वी इंद्रप्रस्थ असे होते,हे महाभारतकालीन नाव असल्याचे बोलले जात होते. हेंद्राबादचे नाव भाग्यनगर असे होते, अलाहाबादचे नाव प्रयाग तर अहमदाबादचे नाव कर्णावती असे होते. जुना इतिहास तपासून योग्य नावे दिली गेली तर आपल्या प्राचीन इतिहासाची ओळख नव्या पिढीला होऊ शकेल.
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की आपल्या देशचनाव भारत किंवा हिंदुस्थान असे होते, या देशात आलेल्या इंग्रजांनी ते नाव इंडिया असे केले. आज भारतात या देशाला काही लोक भारत म्हणतात तर काही इंडिया म्हणतात जागतिक स्तरावर भारत इंडिया म्हणूनच ओळखला जातो अशी दोन नावे असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. आद्य राजा भरत याचे नावाने हा भारत देश ओळखला जातो हि. बाब लक्षात घेत भारत हे नाव जागतिकस तरवार प्रतिष्ठित करावे व इंडिया हे नावं कायचे नामशेष करावे यासाठीही डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढाकार घ्यावा अशी पंचनामाची सूचना आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply