चुकीच्या नियमामुळे रत्नागिरीत आंबा रेल्वे स्थानकात पडून

रत्नागिरी, ३० एप्रिल – मध्य रेल्वेकडून सुटणाऱ्या लांब पल्लय़ाच्या एक्स्प्रेसमधील मालवाहू डब्यांमध्ये जागा राखून न ठेवल्यामुळे सुमारे साडेचारशे कीलो आंबा रत्नगिरी रेल्वे स्थानकात पडून राहिला आहे.
दक्षिणेकडील रेल्वे स्थानकांवर आयत्या वेळी अवाजवी प्रमाणात माल भरल्याने हा प्रकार घडला आहे.
दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील कामगारांनी उन्हाच्या झळा लागू नयेत म्हणून आंब्याची खोकी सुरक्षित ठिकाणी ठेवली असून हा माल दिल्लीला रवाना होण्यासाठी उद्यापर्यंत (३० एप्रिल) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रत्नागिरीतून अन्य राज्यांमध्ये हापूस आंबा पाठवण्यासाठी रेल्वेसेवा उपयुक्त ठरु शकते. गेल्या काही वर्षांंत येथून धावणाऱ्या लांब पल्लय़ाच्या एक्स्प्रेस गाडय़ांमधून हा माल पाठवला जात आहे. मात्र काही वेळा केरळ, कर्नाटकमधून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांना जोडलेल्या माल डब्यात जागा नसल्याने गोंधळ उडण्याचे प्रकार घडले आहेत. माल पाठवणाऱ्या व्यक्तीला त्याचा फटका बसतो. असाच काहीसा अनुभव रत्नागिरीतील आंबा बागायतदार समीर दामले यांनी आला आहे. गुरुवारी निजामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीला आंबा पाठवण्यासाठी त्यांनी आरक्षण केले. पण गर्दी असल्याचे कारण देत शुRवारी राजधानी एक्स्प्रेसमधून हा माल पाठवण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली. प्रत्यक्षात शुRवारी ‘राजधानी’ला जोडलेल्या डब्यांमध्ये ४५० किलो आंबा ठेवण्यासाठी आवश्यक जागाच नसल्याचे निदर्शनास आले. एर्नाकुलमवरुन येणाऱ्या या गाडीत मटण भरण्यात आल्यामुळे येथील हापूसला जागाच मिळाली नाही. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील टपाल कक्षाकडे विचारणा करण्यात आली तेव्हा हा प्रकार पुढे आला. अखेर तेथील अधिकाऱ्यांनी शनिवारचा मुहूर्त दिला आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा बागायतदार दामले यांनी आंबे पाठवले, तेव्हा रेल्वेची सेवा चांगली होती. यावेळी हापूस रेल्वेस्थानकावरच ठेवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे उघडय़ावर ठेवलेली फळं खराब होतात. त्याची काळजी घ्यावी लागते. ती जबाबदारी आंबा बागायतदारावच पडते. सुदैवाने कामगारांकडून शक्य तितकी काळजी घेतली जात आहे. पण खराब रेल्वे सेवेचा फटका बागातदाराला सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे एक्स्प्रेस गाडय़ांमधील माल डब्याची स्थिती काय आहे, याबाबत दक्षिणेकडील रेल्वे स्थानकांकडून समन्वय साधला जात नसल्याबद्दल येथील आंबा बागायतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान हवेतील उष्णता प्रचंड वाढल्यामुळे आंबा भाजून गळून जात आहे. त्यामुळे काढणीला वेग आला आहे. या परिस्थितीत जास्त काळ आंबा साठवून ठेवण्याचे बागायतदारापुढे आव्हानच असते. परराज्यात आंबा पाठविण्यासाठी वेळेचे बंधन असते. त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply