ईडीकडून भावना गवळी यांना समन्स, हजर न राहिल्यास निघणार अजामिनपात्र वॉरंट

वाशीम : २९ एप्रिल – शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे. त्यानुसार खासदार भावना गवळी यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. तसेच चौकशीसाठी हजर न राहिल्यास ईडीकडून भावना गवळी यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. यापूर्वीही ईडीने भावना गवळी यांना अनेक समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र, काही कारणांमुळे त्या ईडीच्या चौकशीला हजर झाल्या नव्हत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना समन्स बजावलं आहे. यावेळी भावना गवळी चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर 2007 मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या.

Leave a Reply