‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर तसेही औषध नसतेच – देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : २८ एप्रिल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकीत जीएसटीबद्दल मुद्दा उपस्थितीत केला असून लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे. तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला किती जीएसटी आतापर्यंत देण्यात आला आहे, याचा पुरावाच जाहीर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून राज्य सरकारला आतापर्यंत किती जीएसटीचा परतावा देण्यात आला आहे. याबद्दल माहिती दिली आहे.
ज्यांच्यासोबत तुम्ही सध्या सत्तेत आहात, त्यांच्या संपुआ सरकारने महाराष्ट्राला जे दिले, त्यापेक्षा कितीतरी अधिक नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्राला दिले आहे. त्यामुळे ‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर तसेही औषध नसतेच, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 हजार कोटी थकबाकी असल्याचा दावा केला होता, तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये फक्त 13 कोटी 627 कोटी थकबाकी असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महाराष्ट्राला पै न् पै देईलच, कारण हे पैसे जुलैपर्यंत द्यायचे असतात. कोरोना काळात केंद्रालाही जीएसटी आला नाही, तेव्हा केंद्राने कर्ज घेऊन राज्यांना पैसे दिले आणि हेही सांगितले की राज्यांना संपूर्ण पैसा दिला जाईल. माझी पुन्हा विनंती आहे, विषय भरकटवू नका. विषय पेट्रोल/डिझेलचे दर कमी करण्याचा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply