नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

नागपूर : २७ एप्रिल – एप्रिल महिन्यात गुन्हेगारी शांत असतानाच शहरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. प्रियकराव्यतिरिक्त अन्य मुलाशी प्रेम झाल्यानंतर पहिल्या प्रियकराने तिच्यासोबत जबरी अत्याचार केला. त्यानंतर त्याचे दोन मित्र जे आपसात भाऊ आहेत त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या घटनेलाही पार्श्वभूमी आहे. ज्या दोन मित्र भावांनी तिच्यासोबत अत्याचार केला त्यांच्या सख्ख्या बहिणीसोबत पीडितेच्या मावस भावाने असेच काही कृत्य केल्याप्रकरणी पीडितेच्या मावस भावावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पीडितेने तक्रार देताना आधी केवळ प्रियकराचे नाव सांगितले त्यानंतर तिने या दोन मित्र भावांचे नाव सांगितले.
पीडिता (वय १७) ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून अल्पवयीन आहे. तिचे यश कांबळे या मुलाशी मैत्री होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. यश कांबळे हा मजुरीचे काम करतो. ते दोघेही एकाच वस्तीत राहत असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. ही ओळख लगेच मैत्री आणि प्रेमात बदलल्यानंतर ते दोघेही २0२0 पासून या प्रेमसंबंधात होते. हे सुरू असतानाच पीडितेचे अन्य एका मुलासोबत प्रेमसंबंध झाले. याची माहिती यश कांबळे यांला मिळाली. परिणामी, त्यांच्यात भांडणे सुरू झाली. नव्या प्रेमसबंधामुळे पीडिता ही यश कांबळे याला भाव देत नव्हती. यामुळे यश चिडला असतानाही त्याने तिच्याशी बोलणे, संपर्क कायम ठेवला. दरम्यान, त्याने १७ एप्रिलला तिला घरी बोलावले. यावेळी यश कांबळेच्या घरी कुणीही नव्हते. यावेळी यशने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर त्याच्या घरी यशचे दोन मित्र जे आपसात भाऊ आहेत ते आले आणि त्यांनी पीडितेला तुझे अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगत ते वायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत आळीपाळीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडितेने यासंदर्भात २४ एप्रिल रोजी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने आधी तक्रार देतेवळी केवळ तिचा प्रियकर यश कांबळे याच्याविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पीडितेने यश कांबळे याचे मित्र ऋषिल आणि रक्षित खोब्रागडे या दोघांची नावे घेतली. या आरोपींचा शोध पोलिस घेत आहे.

Leave a Reply